22.4 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeउस्मानाबाददरोड्याच्या तयारीत असलेल्या तिघांना तामलवाडी पोलिसांकडून अटक

दरोड्याच्या तयारीत असलेल्या तिघांना तामलवाडी पोलिसांकडून अटक

एकमत ऑनलाईन

उस्मानाबाद : चोरी, वाटमारी, किंवा दरोड्याच्या तयारीत असलेल्या तिघांना तामलवाडी पोलीस ठाण्याच्या गस्ती पथकाने पकडले. ही घटना १३ ऑगस्टच्या रात्री तुळजापूर तालुक्यातील पिंपळा (खु.) ते गोंधळवाडी रस्त्यावर घडली. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना कार व हत्यारासह अटक केली असून त्यांच्यावर तामलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तामलवाडी पोलीस ठाण्याचे पथक १३ ऑगस्ट रोजी रात्री गस्तीवर होते. त्यावेळी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिंपळा (खुर्द) ते गोंधळवाडी रस्त्यावर उभ्या असलेल्या टोयोटा कार क्र. एम.एच. १२ ए.एन. ८७२१ जवळ पोलीस गेले असता कारमध्ये असलेले तीघेजण पोलीसांना पाहून पळण्याचा प्रयत्न करु लागले. यानंतर पोलीसांनी त्या तीघांना ताब्यात घेवून विचारपुस केली. सचीन रामा काळे, शाम सुनिल पवार, राहुल राजेंद्र पवार, (तीघे रा. उस्मानाबाद) अशी नावे सांगीतली.

पोलीसांना अधिक संशय आल्याने त्यांनी कारची झडती घेतली असता कारमध्ये एक लोखंडी कटावणी, एक करवत असे साहित्य मिळुन आले. तसेच कारची मालकी- ताबाही ते तीघे सिध्द करुन न शकल्याने ते तीघे अंधाराचा फायदा घेवून मोठा चोरीचा, दरोड्याचा गुन्हा करण्याच्या तयारीत असल्याची पोलीसांची खात्री झाली. पोलीसांनी त्या तीघांसह दरोड्याचे साहित्य व कार ताब्यात घेवून त्यांच्यावर तामलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या