21.2 C
Latur
Friday, October 7, 2022
Homeउस्मानाबादतानाजी सावंत यांचा मंत्रीमंडळात समावेश, उस्मानाबाद जिल्ह्यात जल्लोष

तानाजी सावंत यांचा मंत्रीमंडळात समावेश, उस्मानाबाद जिल्ह्यात जल्लोष

एकमत ऑनलाईन

उस्मानाबाद : शिवसेना शिंदे गटाचे आ. प्रा. तानाजीराव सावंत यांचा मंत्रीमंडळात समावेश झाल्याने उस्मानाबाद जिल्ह्यातील त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष केला. प्रा. सावंत यांचा मतदारसंघ असलेल्या परंडा, भूम, वाशी शहरात तसेच उस्मानाबाद, कळंब शहरात कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत गुलालाची उधळण करीत जल्लोष केला.
उस्मानाबाद शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात प्रा. सावंत यांचे समर्थक माजी उपनगराध्यक्ष सुरज साळुंके यांच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून, शिवाजी महाराजांच्या पुर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार घालून जल्लोष केला.

यावेळी युवानेते अजित लाकाळ यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. प्रा. सावंत यांनी शपथ घेताच कळंब शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौकात फटाक्यांची आतषबाजी व पेढे वाटून जल्लोष करण्यात आला. यावेळी शिंदे गटाचे माजी उपनगराध्यक्ष लक्ष्मीकांत हुलजुते, नगरसेवक अनंत वाघमारे, गजानन चोंदे, हरी तोडकर, ईश्वर शिंदे, मंदार मुळीक, मोतीचंद बागरेचा, कृष्णा हूरगट, सिद्धार्थ वाघमारे, प्रमोद करवलकर, अनिस तांबोळी, फुलचंद कोल्हे, अप्पा सावंत, साखरे मामा आदी उपस्थित होते. प्रा. सावंत यांचा परंडा, भूम, वाशी हा मतदार संघ आहे. या तीनही शहरात कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष केला.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या