32 C
Latur
Friday, April 23, 2021
Homeउस्मानाबादअभर्काला अनाथ आश्रमात सोडताना पोलिसांच्या डोळ्यात अश्रू

अभर्काला अनाथ आश्रमात सोडताना पोलिसांच्या डोळ्यात अश्रू

एकमत ऑनलाईन

कळंब (सतीश टोणगे) : कांही दिवसांपूर्वी एका ठिकाणी सापडलेल्या अर्भकाला अनाथाश्रमात सोडताना महिला पोलीसा़ंना पण गहिवरून येउन डोळ्यातील अश्रूंना वाट करून देत निरोप दिला ही घटना कळंब पोलीस स्टेशन मधील कर्मचार्यांची आहे.

पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने पुरूष अर्भक क्रीडा संकुलाच्या खु्ल्या जागेतील एका ठिकाणी फेकून दिल्याची घटना फेब्रुवारीच्या चार तारखेच्या सकाळी घडली होती. ही घटना कळताच तरूण तडफदार पोलीस उपनिरीक्षक चैनसिंग गुसींगे त्या ठिकाणी जाउन त्या अर्भकाला शासकीय रुग्णालयात घेऊन जाऊन तेथील डॉ पुरूषोत्तम पाटील यांनी शिताफीने त्याला वाचवले नंतर त्या अर्भकाला अंबाजोगाई येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले, त्यां घटनेचा तपास पोलीस निरीक्षक तानाजी दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस फौजदार गणेश तिलंगवाड, व पोलीस उपनिरीक्षक चैनसिंग गुसींगे यांच्या मदतीने तपासाचे सुत्रे तत्परतेने हालवले आणि अवघ्या कांही तासांतच त्या अर्भक क्रीडा संकूलाच्या परिसरात कोणी आणून ठेवले याचा तपास लावला.

परंतु त्या अर्भकाचा सांभाळ नंतर कोणी करायचा? याचा गहन प्रश्न उपस्थित झाला. परंतु काय म्हणतात ना, ‘देव तारी त्याला कोण मारी? ‘त्या गोड अशा अर्भकाकडे लक्ष ठेवण्यासाठी कळंब पोलिसांकडून खबरदारी घेत असतानाच कर्तव्यावर असलेल्या पोलीस महिला कर्मचारी भगिनी गीतांजली फुलसुंदर, राजश्री जावळे, शेलाबाई मोटे, सुषमा लोंढे, रेश्मा ओहाळ, रंजना वडकर यांच्यासह पोलीस काॅन्स्टेबल मिनहाज शेख व सचीन गायकवाड यांनी त्या अर्भकाची खूप खूप काळजी घेतली. जन्मलेल्या बाळाचा जसा सांभाळ घरातील मंडळी करतात तशी काळजी घेतली.

पोलीसांच्या त्या खाकी वर्दीतील काय माणुसकी असते हे तेथील रूग्णालयातील कर्मचारी व अन्य जणांना पाहून थक्क झाले. एकोणीस दिवस पोलीसांच्या त्या ठिकाणी ड्युटी असताना ते पोलीस कर्मचारी आपली नौकरी चक्क विसरून त्या अर्भकाला आपल्या अपत्याएवढा जीव लावला. सतरा ते अठरा दिवस ते अर्भक आपल्या जन्मदात्या आईला सुद्धा विसरून गेले असावे एवढा जीव त्या ठिकाणी कर्तव्यावर असलेल्या पोलीसांनी लावला.

शेवटी एक दिवस असा उजाडला की त्या अर्भकाला बालक आश्रमात दाखल करायची वेळ आली आणि त्या क्षणी खाकीतील खऱ्या माणुसकीचे दर्शन घडले ते असे की, उपरोक्त पोलीस कर्मचारी जे की त्या अर्भकाच्या औषधोपचारासाठी रूग्णालयातील कर्तव्य बजावत असणाऱ्या सहा जणांच्या डोळ्यांतील अश्रूंना वाट करून द्यावी लागली ही परिस्थिती पाहून अन्य जणांचे पण डोळ्यातील अश्रू अनावर झाले. अशारितीने त्या अर्भकाला बालक आश्रम निरोप देताना एक वेगळाच प्रसंग कळंब पोलीस स्टेशन मध्ये घडल्याने नागरिकांना पण आणखीन पोलीस खाकीतील खऱ्या माणुसकीचे दर्शन घडून आले आहे.

सदरील अर्भकाला आणण्यासाठी अँम्ब्युलंन्स ची व्यवस्था होत नसल्याचे कळताच कळंब च्या नगराध्यक्षा सुवर्णाताई व त्यांचे पती सागर मुंडे, शिवसेना तालुका प्रमुख शिवाजी कापसे, नगरसेवक सतीश टोणगे, दिलीप गंभिरे हजर होते. सागर मुंडे यांनी खाजगी वाहनाची ची व्यवस्था करून त्याला अनाथाश्रमात रवाना करण्याची सोय उपलब्ध करून दिली.

जामगा शिवणी प्रकरणी लोह्यात कडकडीत बंद

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,483FansLike
172FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या