21.1 C
Latur
Tuesday, September 28, 2021
Homeउस्मानाबादइटकूर येथे साजरा झाला झाडांचा वाढदिवस

इटकूर येथे साजरा झाला झाडांचा वाढदिवस

एकमत ऑनलाईन

कळंब : आजवर आपण नेत्यांचे, युवानेत्यांचे वाढदिवस पाहिले असतील. पण, कुठे झाडांचा वाढदिवस,तो ही सार्वजनिक स्वरूपात साजरा झाल्याचे ऐकले आहे का? होय तालुक्यातील इटकूर येथे हरीत इटकूर उपक्रमांतर्गत मागच्या तीन वर्षापासून मागच्या काही वर्षात जोपासलेल्या झाडांचा वाढदिवस साजरा केला जातो अन् नव्या वर्षांच्या संकल्पाची मुहूर्तमेढ रोवली जाते. यंदा हा सोहळा आनंदी वातावरणात झाला.

एकेकाळी उजाड अन् ओसाड गाव म्हणून हिणवल्या जाणा-या इटकूर गावात मागच्या तीन वर्षापासून गावाला हिरवं करण्याचे स्वप्न घेवून काही युवक धडपडत आहेत. या संकल्पनेला मुर्त स्वरूप देण्यासाठीच आपलं इटकूर – हरीत इटकूर या चळवळीचा श्रीगणेशा झाला. यासाठी हरीत इटकूर समिती स्थापन करण्यात आली.

समितीच्या माध्यमातून बाबा जगताप, अमर आडसूळ, अभयसिंह आडसूळ, सत्यदेव जगताप, गणेश आडसूळ, स्वप्निल आडसूळ, दिनकर आडसूळ , प्रभाकर आडसुळ, महेश आडसुळ, हेमंत पोते, रामराजे आडसूळ यांच्यासह असंख्य युवकांनी हरीत इटकूर या बॅनरखाली एकत्र येत वृक्ष लागवड व संगोपनावर भर देणारा कार्यक्रम राबवण्यास सुरूवात केला. यातून झोपडपट्टी भागात नारळाची बाग, मुख्य रस्त्यावर शोभेची, बाजार मैदानात qलब, करंजी, सप्तपर्णी, ग्राप समोर वटवृक्ष, पशुवैद्यकीय दवाखाना आदी भागात विविध पाचशे झाडांची जोपासना करण्यात आली आहे.

यातील बहुतांश झाडे आज सावलीचा आनंद देत आहेत, हिरवळ निर्माण होवून हरीत इटकूरची अनुभूती देत आहेत. यावेळी आ. कैलास पाटील, राष्ट्रवादीचे नेते डॉ. प्रतापसिंह पाटील यांच्या शुभहस्ते वृक्ष पुजन, झाडांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी मुंबई महानगर पालिकेचे कार्यकारी अभियंता दत्तात्रय आडसूळ, शिवसेनेचे नेते प्रविण कोकाटे, वन अधिकारी सचीन लोंढे, माजी जिप सदस्य बालाजी आडसूळ, सरपंच मोहरबाई कस्पटे, रोटरीचे सचिव अरविंद शिंदे , पदाधिकारी डॉ गिरीश कुलकर्णी, हर्षद अंबुरे, वैजनाथ पकवे, भगतसिंग गहेरवार, केमिस्टचे अध्यक्ष प्रमोद पोते आदी उपस्थित होते.

यावेळी समितीचे अमर आडसूळ, बाबा जगताप, अभयसिंह आडसूळ यांनी स्वागत केले तर सेवानिवृत्त आदर्श शिक्षक तुकाराम सिंदे यांनी सूत्रसंचालन केले तर आभार समितीचे बालाजी अडसूळ यांनी मानले. यावेळी मागच्या तीन वर्षात जोपासलेल्या झाडांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. याशिवाय वृक्षपूजन करून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

या वेळी बोलताना आ. कैलास पाटील यांनी आजवर आम्हाला अनेकांच्या वाढदिवसाला जाण्याचा योग आला, परंतु हा पहिलाच कार्यक्रम आहे की ज्यात लावलेल्या झाडांचा वाढदिवस साजरा करण्यात येतो. हा उपक्रम कौतुकास्पद व अनुकरणीय असून यापुढे या युवकांनी उपक्रमासाठी हवी ती मदत मागावी, एक लोकप्रतिनिधी म्हणून मी ते करेल असे सांगितले. मागच्या तीन वर्षात पाचशेच्या आसपास झाडं जगवण्याचे, वाढवण्याचे धनुष्य पेलण्यानंतर हरीत इटकूर समितीने कळंब रस्त्यावर दुतर्फा सातशे झाड लावली आहेत. यात नारळ, बदाम,मोहगणी अशा विविध वृक्षांचा समावेश आहे.इटकूर येथील हरीत इटकूर उपक्रमांतर्गत राबवण्यात येणा-या वृक्ष संगोपन कार्यक्रमासाठी गावकरी तन, मन, धनाने मदत करतात. यासाठी लोकवर्गणी जमा करण्यात येते. यासाठी गावचे सुपूत्र तथा मुंबई महानगरपालिकेत कार्यकारी अभियंता म्हणून कार्यरत असलेले दत्तात्रय बाबूराव आडसूळ यांनी पंचेवीस हजाराची मदत करून उपक्रमास बळ दिले.

दहावीचा निकाल उद्या जाहीर होणार

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
194FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या