21.1 C
Latur
Tuesday, August 16, 2022
Homeउस्मानाबादघरफोडीतील आरोपीच्या मुसक्या आवळल्या

घरफोडीतील आरोपीच्या मुसक्या आवळल्या

एकमत ऑनलाईन

उस्मानाबाद : शहरातील झाडे गल्ली येथे १९ जून २०२२ रोजी घरफोडी झाली होती. या प्रकरणातील आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुंबई येथून अटक केली आहे.

उस्मानाबाद शहरातील झाडे गल्ली भागातील रहिवाशी रेखा बाळासाहेब पवार या पतीसह बाहेर गावी गेल्या होत्या. दरम्यान, पवार त्यांच्या वयोवृध्द सासू या घरी एकट्याच होत्या. रेखा यांची सासू यांनी १९ जून रोजी रोजी सायंकाळी ५ ते ६ वाजण्याच्या दरम्यान घरास कडी लावून बाहेर गेल्या होत्या. त्यांच्या घराची कडी अज्ञात व्यक्तीने उघडून घरातील कपाटात ठेवलेले ३७० ग्रॅम वजनाचे सुवर्ण दागिने चोरून नेले होते. याप्रकरणी रेखा पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उस्मानाबाद शहर पोलीस ठाण्यात क्र. १९०/२०२२ हा भादंवि कलम ४५४, ३८० अंतर्गत २० जून रोजी नोंदविला आहे.

गुन्हा तपासादरम्यान स्थानिक गुन्हे शाखेतील अधिकारी अंमलदार यांनी घटनास्थळ व आजुबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पडताळणी केली. सदरचा गुन्हा करणारे आरोपी त्या फुटेजमध्ये घटनास्थळावरून जा-ये करत असताना दिसून आले. त्यानंतर प्राप्त सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारावर विक्रांत जगन्नाथ सवाईराम, सरोजा विक्रांत सवाईराम या दोघा पती-पत्नीला मुंबई येथील रबाळे रेल्वे स्थानकावरून १ जुलै रोजी ताब्यात घेतले.

त्यांच्याकडे गुन्ह्याच्या अनुशंगाने कसून चौकशी केली असता त्या दोघांनी गुन्हा केल्याची कबुली देऊन सदर गुन्ह्यातील सुवर्ण दागिने हे त्यांचे मुळ गाव शिराळा (ता. वाळवा, जि. सांगली) येथील आपल्या घरी ठेवले असल्याचे सांगितले. यावर पथकाने नमूद गुन्ह्यातील चोरीच्या सुवर्ण दागिन्यांपैकी ३१० ग्रॅम वजनाचे सुवर्ण दागिने आरोपीतांच्या घरातून हस्तगत केले आहे.

सदरची कामगिरी पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पोनि रामेश्वर खनाळ, सपोनि शैलेश पवार, पोहेकॉ हुसेन सय्यद, महेबुब अरब, पोना अमोल चव्हाण, शैला टेळे, पोकॉ रवी आरसेवाड यांच्या पथकाने केली.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या