24 C
Latur
Tuesday, October 19, 2021
Homeउस्मानाबादमांजरा धरण शंभर टक्के भरले

मांजरा धरण शंभर टक्के भरले

एकमत ऑनलाईन

कळंब (सतीश टोणगे) : कळंब तालुक्यातील मांजरा प्रकल्प क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने मांजर नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. या मुळे धनेगाव येथील मांजरा धरणाच्या पाणी पातळी मध्ये झपाट्याने वाढ होत आहे धरण शंभर टक्के भरल्यामुळे धरणावर अवलंबून असलेले शेतकरी सुखावले आहेत.जलपूजन करून आनंद व्यक्त केला.तर पाण्याची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी मांजरा धरणा च्या उजव्या कालव्यातून 1.27 प्रती से घ मी ने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. तालुक्यात सर्वदूर झालेल्या मुरपावसामुळे विंधनविहिरी,कुपनलिकेच्या पाणी पातळीत वाढ होत आहे.सर्व नदी,नाल्या वाहू लागल्या आहेत.हे धरण भरल्याने या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्या नी जलपूजन करून आनंद व्यक्त केला.

मागच्या काही दिवसापासून प्रदीर्घ विश्रातींतर पावसाने सुरवात केली आहे..बहुतांश भागात मुर पाऊस सुरू झाला .त्यामुळे विहिरी,कुनलिकेच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. पावसामुळे शेतीची मशागतीची कामे थांबली आहेत.धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने हे धरण भरले आहे.तर शेताचे तळे होऊन बसल्याने पिकाची, पाले भाज्या चे नुकसान झाले आहे.

तालुक्यात पावसाने पासून च हलक्या स्वरूपात हजेरी लावली.मुर पाऊस झाल्याने पाणीपातळीत वाढ होण्यास मदत मिळाल्याने शेतकऱ्याना दिलासा मिळाला आहे. लातूर,अंबाजोगाई,कळंब,केज,धारूर आदी गावासाठी पाणी पुरवठा करणारे मांजरा प्रकल्प या वेळी ही पूर्ण क्षमतेने भरणार असल्याची चिन्हे आहेत. या नदीचे उगमस्थान भूम,जामखेड,खर्डा परिसरातून झाल्याचे सांगण्यात येते. मांजरा नदी दुथडी भरून वाहत आहे.त्यामुळे मांजरा प्रकल्प शंभर टक्के भरला आसून, पाणी सोडण्यात आल्याची माहिती शाखा आभियंता शाहूराज पाटील यांनी दिली.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या