33.7 C
Latur
Monday, March 1, 2021
Home उस्मानाबाद जिल्हाधिकारी यांनी पिंप्रीच्या शेतक-यांची शेतात बसून ऐकली कैफियत

जिल्हाधिकारी यांनी पिंप्रीच्या शेतक-यांची शेतात बसून ऐकली कैफियत

एकमत ऑनलाईन

उस्मानाबाद : जिल्हा निवडणूक प्रशासनाचे ईव्हीएम मशीन ठेवण्याचे मुख्य गोडाऊन पिंप्री ता. उस्मानाबाद येथे आहे. या गोडावनच्या बाजूला व परिसरात शेती आहे. मंगळवारी सकाळी जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने मुख्य गोडाउन येथे ई. व्ही. एम. मशीनची पाहणी करण्यासाठी आलेले होते.

येथील ईव्हीएम मशीनची पाहणी करून झाल्यानंतर जिल्हाधिकारी दिवेगावकर गोडावनच्या बाहेर पडले. यावेळेस गोडावनच्या बाजूला असलेल्या शेतक-यांच्या शेतीकडे त्यांचे लक्ष गेले व त्यांनी उप जिल्हा निवडणूक अधिकारी प्रताप काळे यांनासोबत घेऊन शेतकरी शहाजी गायकवाड यांच्या शेतावर गेले. स्वतः जिल्हाधिकारी व त्यांचे सहकारी आपल्या शेतावर आलेले पाहून शेतकरी शहाजी गायकवाड यांना विश्वास बसेना!सध्या कोणत्याही प्रकारची पाहणी, पंचनामे वगैरे काही नसताना जिल्हा प्रशासन म्हणजे स्वतः जिल्हा प्रशासन प्रमुख जिल्हाधिकारी आपल्या शेतावर आल्याचे पाहून शहाजी गायकवाड हे आश्चर्यचकित झाले.

परंतु त्यांच्या चेह-यावरील आनंद ही दिसून आला.शेतक-याने जिल्हाधिकारी यांना बसण्यासाठी काही व्यवस्था करण्यासाठी इकडे तिकडे बघू लागले. त्यावेळी जिल्हाधिकारी दिवेगावकर म्हणाले, की काही काळजी करू नका आम्ही खाली जमिनीवर बसतो. मी फक्त तुम्हाला येथे भेटण्यासाठी व विचारपूस करण्यासाठी आलेलो आहे. कोणतेही आदरतिथ्याची आवश्यकता नाही. त्यावेळी शेतकरी गायकवाड यांनी जमिनीवर चटई अंथरली व जिल्हाधिकारी यांनी कोणताही संकोच न करता भारतीय बैठकीप्रमाणे मांडी घालून खाली बसले. व शेतकरी गायकवाड यांची आस्थेवाईकपणे चौकशी करत म्हणाले की, कसे आहात? तुमचे आरोग्य कसे आहे.

तसेच यावर्षीच्या खरीप हंगाम कसा झाला. अतिवृष्टीमुळे तुमच्या शेतीपिकांचे काही नुकसान झाले का? नुकसान झाले असेल तर पंचनामे होऊन तुम्हाला काही मदत मिळाली का? असे विचारले. यावेळी गायकवाड यांनी या वर्षीचा खरीप हंगाम ते रब्बी पर्यंतचे सर्व कैफियत मांडली. खरीप हंगामात सोयाबीन काढून ठेवलेला होता, परंतु अतिवृष्टीने त्याच्यामध्ये पाणी जाऊन सर्व सोयाबीनचे नुकसान झाले. झालेल्या नुकसानीची जिल्हा प्रशासनाच्या वतीने पाहणी करून पंचनामे झालेले आहेत. परंतु मदतीबाबत अद्यापही काही माहिती मिळालेली नाही. तसेच शासनाकडून इतर कोणत्याही प्रकारची मदत अद्यापपर्यंत मिळालेले नसल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी यांनी लगेच तहसीलदार गणेश माळी यांना भ्रमणध्वनीवरून कॉल करून शेतकरी शहाजी गायकवाड व श्रीमती त्रिशाला, देवशाला यांच्याविषयी माहिती दिली. तसेच यांना शासनाकडून कशा पद्धतीने मदत देता येईल, याबाबतची माहिती सादर करावी व श्रीमती त्रिशाला यांना शासनाच्या कोणत्या योजनेतून लाभ देता येईल याबाबत माहिती घेऊन त्यांना लाभ देण्याबाबत सुचित करण्यात आले. तसेच शेतकरी गायकवाड यांच्या सोयाबीनच्या झालेल्या नुकसानीची पंचनामे कशा पद्धतीने झालेले आहेत व त्यांना झालेल्या नुकसानीची मदत त्वरित मिळाली पाहिजे.

याबाबतची कार्यवाही करून अहवाल सादर करावा. तसेच या शेतक-यांना शेतीपूरक व्यवसाय करण्यासाठी शासनाच्या कोणत्या योजनेतून कशा पद्धतीने अर्थसहाय्य व मदत करता येईल याचीही खातरजमा करण्याबाबत त्यांनी सुचित केले. जिल्हाधिकारी यांनी तात्काळ तहसीलदारांना दिलेल्या सुचनेनुसार शेतकèयांना मदत मिळेल. यामुळे शेतक-यांच्या चेह-यावर आनंद दिसून येत होता.

पंधरा शेतक-यांना तीस लाखांचा गंडा

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,438FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या