27.8 C
Latur
Thursday, October 21, 2021
Homeउस्मानाबादजिल्ह्याला कोरोना संकटाचा पडला विळखा

जिल्ह्याला कोरोना संकटाचा पडला विळखा

एकमत ऑनलाईन

उस्मानाबाद : जिल्ह्याला कोरोना विषाणू संसर्ग या महामारी आजाराने शहरी भागासह ग्रामीण भागातील तांडा, वाडी, वस्तीवरही विळखा घातला आहे. दिवसेंदिवस रुग्णसंख्येचा आलेख वाढततच चालला आहे. शनिवारी (दि.८) दुपारी प्राप्त झालेल्या अहवालानुसार १२० नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे आजवरच्या एकुण बाधितांची संख्या २१५० वर पोहचली आहे. त्यात १२८८ जणांवर उपचार सुरू असून ७९८ जणांना उपचारानंतर घरी सोडले आहे. मात्र ६४ जणांना या महामारी आजाराने गिळंकृत केले आहे.

उस्मानाबाद येथील जिल्हा रुग्णालयामार्फत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय औरंगाबाद आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्र येथील कोविड चाचणी केंद्राकडे पाठविण्यात आलेल्या ४१४ स्वॅबपैकी ३५१ अहवाल शुक्रवारी रात्री उशिरा प्राप्त झाले. यातील तब्बल १२० जण पॉझिटिव्ह आले आहेत. २२५ अहवाल निगेटिव्ह आले असून ६ संदिग्ध आहेत. तर ६३ अद्याप प्रलंबित आहेत. यामध्ये उस्मानाबाद शहर व तालुक्यात २७, उमरगा २८, तुळजापूर १३, कळंब १५, परंडा ३१, भूम १, वाशी ०८ असे एकुण १२० रुग्ण आढळून आले आहेत. उस्मानाबाद तालुक्यातील पाडोळी येथे ७, तेर येथे ६, रुईभर, हिंग्लजवाडी येथे प्रत्येकी १ तर शहरातील जुना बस डेपो येथे १, टीपीएस रोड येथे ५, शंकरनगर ३, जिल्हा रुग्णालय १, संत ज्ञानेश्वर नगर येथे १ रुग्ण आढळला आहे. तुळजापूर शहरातील जिजामाता नगर, यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, कुंभार गल्ली येथे प्रत्येकी १ रुग्ण, कमानवेस येथे ४, विश्वासनगर २ तर तालुक्यातील मसला येथे २ रुग्ण आढळले आहेत. उमरगा शहरातील बालाजीनगर, उपजिल्हा रुग्णालय, गौतमनगर, काळे प्लॉट, पतंगे रोडसह तालुक्यातील कोरेगाववाडी, तुरोरी, कोराळ, गुंजोटी येथे नवे रुग्ण आढळले आहेत.

कळंब शहरातही सोनार गल्ली, खाटिक गल्ली तर तालुक्यातील चोराखळी, डिकसळ, येरमाळा, रत्नापूर, वडगाव निपाणी येथे नवे रुग्ण आढळून आले आहेत. परंडा तालुक्यातील शेलगाव येथे ११ रुग्ण नव्याने आढळले आहेत. शहरातील सोमवार गल्ली, शेवाळे वस्ती, नालसाब गल्ली, खंडोबा चौक, राजापूर गल्ली, मंडई पेठ, समतानगर, मंगळवारपेठ, खुर्द गल्ली ताजुक्यातील पाचqपपळा येथे नवे रुग्ण आढळले आहेत. वाशी येथील एसबीआय बँकेत ३ तर बसस्थानक भागात ५ रुग्ण आढळले आहेत. दरम्यान, कळंब तालुक्यातील भाटशिरपुरा येथील ६६ वर्षीय वृद्धाचा सोलापूर येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे आजवरच्या मृतांची संख्या ६४ झाली आहे.

जिल्ह्यात कोरोनाचा सुरवातीला उमरगा तालुक्यात फैलाव झाला होता. मात्र आता उस्मानाबाद, तुळजापूर, कळंब शहरात रुग्ण संख्येत मोठी वाढ होत चालली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये आता भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सिरसाव येथे कोरोनाचे थैमान
जवळा(नि) : परंडा तालुक्यातील सिरसाव येथे गेल्या पंधरा दिवसांपूर्वी ११ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले होते. त्यामुळे शनिवारी (दि. ८) येथील ९६ जणांची रॅपिड तपासणी केली होती. त्यात २६ रुग्ण कोरोणा पॉझिटिव्ह आढळून आले असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी जहुर सय्यद यांनी दिली.

सिरसाव गावात एकाच दिवसात २६ रुग्ण आढळल्याने गावातील पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा ३७ वर पोहोचला आहे. त्यामुळे गावात भीती निर्माण झाली आहे. गावात कोरोना रोखण्यासाठी संपूर्ण गाव पंधरा दिवसांसाठी कडेकोटपणे बंद करणे गरजेचे आहे. सिरसाव या गावातील नागरीकांचा संपर्क सोलापूर जिल्ह्यातील बार्शी या शहरातुन जास्त प्रमाणात असल्याने कोरोना विषाणूचा फैलाव बार्शी शहरातुनच झाला असल्याचे बोलले जात आहे.

सास्तूर येथे एकास कोरोनाची लागण
तालुक्यातील सास्तुर गावात एका ३८ वर्षीय नागरिकाचा कोरोना अहवाल पॉजिटिव्ह आला आहे. शुक्रवारी (दि. ७) सास्तूर येथील स्पर्श रूग्णालय येथे टेस्टिंग केली असता कोरोना असल्याचे अहवाल आले आहे.

या व्यक्तीच्या अतिजोखिमेच्या यादीत १३ जणांचा समावेश आहे. एल आर यादीत १६ जण आहेत. कॉनंटाईन झोनमध्ये एकूण २० घरांचा समावेश आहे. आरोग्य यंत्रणेची १ टीम आरोग्य सर्वे पुढील १४ दिवस करणार असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे यांनी सांगितले. या आरोग्य सर्वेक्षणात आशा कार्यकर्ती बेबी आयेशा कादरी, जाधव के. ए., सुपरवायझर उध्दव काळे हे कर्तव्य बजावीत आहेत.

कंडारीत कोरोना रुग्ण आढळल्याने खळबळ
परंडा तालुक्यातील कंडारी येथे एका व्यक्तीचा कोरोना अहवाल गुरुवारी (दि. ६) पॉझिटिव्ह आला आहे. सदर व्यक्तीवर बार्शी येथील रुग्णालयात उपचार सुरू आहे. तालुक्यात कोरोनाचा प्रार्दूभाव रोखण्यासाठी महसूल तसेच आरोग्य विभागाकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. तरीदेखील परंडा तालुक्यात शहरासह ग्रामीण भागात रुग्णांची संख्या वाढत आहे.

कंडारी येथे आजपर्यंत एकही रुग्ण आढळून आला नव्हता. एका व्यक्तीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामपंचायतकडून परिसर सिल केला आहे. तसेच विविध उपाययोजना राबविण्यात याव्यात, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या