28 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeउस्मानाबादकारच्या अपघातात चालकाचा जागीच मृत्यू

कारच्या अपघातात चालकाचा जागीच मृत्यू

एकमत ऑनलाईन

उस्मानाबाद : आपल्या ताब्यातील कार निष्काळजीपणे चालविल्याने झालेल्या अपघातात चालक ठार झाला आहे. तुळजापूर येथील विश्वास नगर भागातील रहिवाशी आनंद धन्यकुमार क्षिरसागर यांनी ३ जुलै रोजी तुळजापूर ते उस्मानाबाद महामार्गावरील बोरी फाटा रस्त्यावर ुंदाई व्हेरेना कार निष्काळजीपने, भरधाव वेगात चालवल्याने कारच्या समोरील डाव्या बाजूचे चाक फुटल्याने कारचा अपघात झाला. या अपघातात आनंद क्षिरसागर हे स्वत: गंभीर जखमी होऊन मयत झाले.

याप्रकरणी धन्यकुमार क्षिरसागर (रा. विश्वासनगर, तुळजापूर) यांनी ११ सप्टेंबर रोजी तुळजापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यावरून भादंसं कलम २७९, ३०४ (अ) सह मोटार वाहन कायद्याचे कलम १८४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलिस करीत आहेत.

 

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या