23 C
Latur
Friday, August 12, 2022
Homeउस्मानाबादविजेची तार अंगावर पडल्याने शेतकरी जखमी, बैल दगावला

विजेची तार अंगावर पडल्याने शेतकरी जखमी, बैल दगावला

एकमत ऑनलाईन

उस्मानाबाद : विजेची तार तुटून अंगावर पडल्याने शॉक लागून शेतकरी गंभीर जखमी तर बैल जागीच ठार झाला आहे. ही घटना अंबेजवळगा (ता. उस्मानाबाद) शिवारात बुधवारी दि. ६ जुलै रोजी घडली आहे. या घटनेचा पोलिस व तलाठी यांनी पंचनामा केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुंजेवाडी ता. उस्मानाबाद येथील शेतकरी दत्तात्रेय कोंडीबा जगताप यांची अंबेजवळगा शिवारात शेती आहे. बुधवारी दुपारी त्यांच्या शेतातून गेलेली विजवाहीनी तुटून बैलाच्या अंगावर पडल्याने शॉक लागून बैल जागीच ठार झाला. शेतकरी दत्तात्रय जगताप यांचा मुलगा पवन जगताप यालाही विजेचा शॉक लागल्याने गंभीर जखमी झाला आहे.

जखमी पवन याच्यावर उस्मानाबाद येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती समजताच ग्रामीण ठाण्याचे पोलिस हेडकॉन्स्टेबल भीमराव ढगे व तलाठी जमादार यांनी घटनास्थळ पंचनामा केला आहे.

शॉक लागून म्हैसही दगावली
अंबेजवळगा तांडा (ता. उस्मानाबाद) येथे विजेचा शॉक लागून म्हैस जागीच ठार झाल्याची घटना गुरुवारी दि. ७ जुलै रोजी सकाळी घडली आहे. अंबेजवळगा तांडा येथे गावठाण डीपीच्या स्टेला म्हैस चिकटल्याने शॉक लागून शेतकरी देवीचंद येमाजी चव्हाण यांची म्हैस दगावली आहे. या दोन्ही घटनेत शेतक-यांचे मोठे नुकसान झाले आहे. शासनाने आर्थिक मदत देण्याची मागणी होत आहे.

 

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या