22.1 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeउस्मानाबादकोरोना लॅबसाठी मदत करणारांचा शेतकरी संघर्ष समितीकडून सत्कार

कोरोना लॅबसाठी मदत करणारांचा शेतकरी संघर्ष समितीकडून सत्कार

एकमत ऑनलाईन

उस्मानाबाद : जिल्ह्यात कोरोना रुग्णांचे स्वॅब तपासणीची मोठी अडचण होती. ही अडणच लक्षात घेवून विद्यापीठाचे कार्यकारी समितीचे सदस्य संजय निंबाळकर यांनी पुढाकार घेवून जिल्हाधिकारी दिपा मुधोळ यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील दानशून व्यक्तींनी एकत्र करत स्वखर्चातून १ कोटी २५ लाखाची टेस्टींग लॅब उभारली आहे. या लॅबसाठी आर्थिक मदत करणाèया मान्यवरांचा शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने गुरुवारी (दि. ३०) जिल्हाधिकारी कार्यालयात शाल, श्रीफळ व पुष्पहार देवून सत्कार करण्यात आला.

ही लॅब उभारणीसाठी जिल्हाधिकारी दिपा मुधोळ-मुंडे, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते, उपजिल्हाधिकारी शिरीष यादव, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा उपकेंद्राचे संजय qनबाळकर, डॉ. दिक्षीत सर, जनता बँकेचे चेअरमन ब्रिजलाल मोदाणी, विश्वास शिंदे, नॅचरल शुगरचे चेअरमन बी. बी. ठोंबरे, जिल्हा निबंधक विश्वास देशमुख, जिल्हा शल्य चिकीत्यक डॉ. राजाभाऊ गलांडे, धाराशिव शुगर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील, पतसंस्था फेडरेशनचे अमरqसह देशमुख, सतिश दंडनाईक, रुपामाता उद्योग समुहाचे अ‍ॅड. व्यंकट गुंड, बालाजी अमाइन्स श्री. रेड्डी, गोकुळ शुगरचे qशदे आदींनी आर्थिक मदत केली.

त्यामुळे शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने शाल, श्रीफळ पुष्पहार देवून सत्कार करण्यात आला. यावेळी शेतकरी संघर्ष समितीचे संयोजक संजय पाटील दुधगावकर, इकबाल पटेल, बालाजी डोंगे, अनिल जाधव, नामदेव चव्हाण आदींची उपस्थिती होती. जिल्ह्यात उभारण्यात आलेली ही लॅब महाराष्ट्रातील लोकसहभागातून उभारणारी पहिली लॅब ठरली आहे. या टेस्टींग लॅबचा कोरोना रुग्णांसाठी तर फायदा होणार आहेच. शिवाय इतर संसर्गजन्य आजाराबाबत तपासणीसाठी कायमस्वरुपी फायदा होणार आहे.

Read More  मोहोळ तालुक्यात कोरोनामुळे जनजीवन विस्कळीत

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या