27.8 C
Latur
Thursday, October 21, 2021
Homeउस्मानाबादअनाळ्यात पहिला कोरोना रुग्ण आढळला, नागरिकांत भिती

अनाळ्यात पहिला कोरोना रुग्ण आढळला, नागरिकांत भिती

एकमत ऑनलाईन

आनाळा : परंडा तालुक्यातील आनाळा येथे पहिला कोरोना रुग्ण आढळुन आला आहे. आनाळा येथील ६८ वर्षाची महिला मुलीकडे रुई येथे गेली असता रुई येथेच कोरोनाची लागण झाल्याचो दिसुन आले आहे. आनाळा गावाशी रोज २५ ते ३० गावांचा संपर्क असून येथील बाजारपेठ या गावांसाठी महत्वाची मानली जात आहे.

कोरोना रोगाच्या अनुषंगाने दोन दिवसापुर्वीच आनाळा गावातील ७२ व्यापा-यांची रॅपीड अँन्टीजेन कोरोना टेस्ट घेण्यात आली होती. परंतू ७२ जणांच्या टेस्टमध्ये एकही व्यापारी पॉझिटिव्ह नसल्याने आनाळा गावातील व्यापा-यांनी व नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला होता. परंतू काल आलेला वृद्ध महिलेचा पॉझिटिव्ह रिपोर्ट हा सर्व व्यापा-यांच्या काळजाचा ठोका चुकवणारा आहे.

संपूर्ण आनाळा गावासह आसपासच्या खेड्यापाड्यात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. सदरील महिला ही तीच्या मुलीकडुन आल्यानंतर आनाळा येथील एका खाजगी दवाखान्यात उपचारासाठी गेली होती. त्यामुळे दवाखाना पुढील १४ दिवसाठी बंद करण्याचे आदेश आनाळा येथील ग्रामसेवक बिराजदार यांनी दिले आहेत. सदरील महिलेच्या कॉन्टॅक्टमध्ये आलेल्या सर्वांना होम कॉरंटाईन करुन त्यांची कोरोना टेस्ट करुन घेण्याचे आदेश दिले आहेत.

कोरोना पॉझिटिव्ह सापडलेल्या भागाची डॉ. जी.एस. खटके, आरोग्य सहाय्यक वाय. व्ही. कदम, आरोग्य सेवक विटकर सुनिता, आशा सेवीका अनिता क्षिरसागर, जयश्री हिवरे, ग्रामसेवक बिराजदार व ग्रामपंचायत शिपाई भिवा चव्हाण, समाधान गोडसे यांनी पहाणी करुन सदरील भाग प्रतिबंधक म्हणुन घोषीत केला.

मुंबईतील हत्याकांड : ९ तरुणांना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या