28.2 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeउस्मानाबादकृषी सेवा केंद्राचे गोडाऊन फोडले

कृषी सेवा केंद्राचे गोडाऊन फोडले

एकमत ऑनलाईन

लोहारा : गेल्या अनेक दिवसांपासून शहरात भुरट्या चोरीचे प्रमाण वाढले आहे. दरम्यान, २२ जुलै रोजी अज्ञात चोरट्यांनी शहरातील कृषी सेवा केंद्राचे गोडाऊन फोडून सुमारे सव्वा लाख रूपयांचा मुद्देमाल लंपास केला. शहरात वाढत्या चोर्‍यांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी तात्काळ दखल घेऊन चोरट्यांच्या मुसक्या आवळण्याची मागणी होत आहे.

लोहारा शहरामध्ये योगेश मारुती देवकर (रा. मार्डी) यांच्या नावे असलेले शिरोमणी कृषी सेवा केंद्र एसबीआय बँक आंबेडकर चौकात माशाळकर कॉम्प्लेक्समध्ये आहे. या कृषी सेवा केंद्रांचे गोडाऊन कानेगाव-कास्ती रोड बाजार समितीत दक्षिण-उत्तर स्थितीत पूर्व बाजुला गाळा क्रमांक ७ मध्ये आहे. सदर कृषी सेवा केंद्रामध्ये अपुर्‍या जागेमुळे अतिरिक्त खत गोडाऊनमध्ये ठेऊन तेथूनच शेतकर्‍यांना दिले जाते.

दरम्यान, २२ जुलै रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास गोडाऊनच्या शटर खालील विटांचे भाग पोखरून चोरी झाल्याचे शेजारील व्यापार्‍याच्या निदर्शनास आले. चोरीबाबत कृषी दुकानदारास भ्रमणध्वनीद्वारे कळविल्यानंतर ही बाब उघडकीस आली.

चोरट्याने शटर खालील भाग पोखरून आत प्रवेश करीत ९-२४-२४ उसाचा खत ६० पोते अंदाजे किंमत एक लाख, रूट झोन बकेट ५० नग किंमत अंदाजे २५ हजार रूपये असे अंदाजे सव्वा लाख रुपये किंमतीचे खत अज्ञात चोरट्याने चोरून नेले. याप्रकरणी उमराव मारूती देवकर यांनी लोहारा पोलिसांत तक्रार दिली. त्यावरून अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोहारा शहरात चोरीचे प्रमाण वाढले
दरम्यान, दुसर्‍या एका घटनेत जुन्या गावातील हनुमान मंदिरजवळ रहात असलेले बाळू रामकृष्ण पाटील यांची दुचाकी (एमएच २५/एक्स/७४३१) ही अज्ञात चोरट्यांनी पळवून नेली. घरासमोर दोन-तीन दुचाकी लावलेल्या असताना त्यातील एकच दुचाकी चोरांनी पळवून नेली. याबाबत लोहारा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या