22.5 C
Latur
Wednesday, December 8, 2021
Homeउस्मानाबादआपद्ग्रस्त शेतकऱ्यांना ऑक्टोबर अखेरपर्यंत मिळावी यासाठी महाविकास आघाडीचे शासन प्रयत्नशील

आपद्ग्रस्त शेतकऱ्यांना ऑक्टोबर अखेरपर्यंत मिळावी यासाठी महाविकास आघाडीचे शासन प्रयत्नशील

एकमत ऑनलाईन

लातूर : अतिवृष्टी आणि पूरामुळे उद्भवलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर उस्मानाबाद जिल्ह्यातील तेर व इतर कांही गावात जाऊन आज राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांनी पहाणी केली, ग्रामस्थ शेतकरी यांच्याशी संवाद साधून त्यांना दिलासा दिला, आपत्तीग्रस्त सामान्य माणूस लवकरात लवकर आपल्या पायावर उभा राहील या दृष्टीने महाविकास आघाडीचे शासन सर्वतोपरी मदत करेल असा त्यांनी दिलासा दिला आहे.

शनिवार दि. २ ऑक्टोबर रोजी उस्मानाबाद येथे लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतल्या नंतर ना. अमित विलासराव देशमुख यांनी उस्मानाबाद जिल्हा पूर व अतिवृष्टीने नुकसान झालेल्या अपद्ग्रस्तांच्या भावनेशी महाविकास आघाडी सरकार एकरूप असून, आगामी एक महिन्याच्या आत विमाकंपन्या आणि शासनाकडून सर्वांना मदत देण्याचा प्रयत्न राहील असे उस्मानाबाद येथे पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली.

यावेळी माजी मंत्री काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मधुकरराव चव्हाण, उस्मानाबादचे आमदार कैलास पाटील, जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता, उस्मानाबाद जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष धीरज पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी एम.रमेश, तहसिलदार गणेश माळी, निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी आदीसह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

ना. देशमुख म्हणाले की, महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात पूर व अतिवृष्टीमुळे शेत पीक व शेत जमिनीचे मोठे नुकसान झाले आहे उस्मानाबाद मध्ये दोन लाख 66 हजार हेक्टर बाधित क्षेत्र आहे अंतिम आकडे येथील काही दिवसात जिल्ह्यातील काही रस्ते व पूल वाहून गेले आहेत तर काही खराब झाले आहेत घराची अंशता पडझड झालेली आहे अशा सर्वांना तात्काळ मदत देण्याचा प्रयत्न राहणार आहे

या शिवाय शासकीय यंत्रणानी मंगळवार पर्यंत नुकसानीचे पंचनामे पूर्ण करून प्राथमिक अहवाल शासनाकडे सादर करावा, विमा कंपन्यांनी, गावपातळीवर ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने स्वीकारावेत, महसूल आणि कृषी विभागाचे अहवाल विमा कंपन्यांनी सँपल सर्वे म्हणून स्वीकारावेत, ज्यांच्या घरात पाणी घुसले होते, किंवा घराची पडझड झाली आहे त्या अपद्ग्रस्थाना तातडीने जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करावा. त्यांच्या कायमस्वरूपी पुनर्वसनाचा प्रस्ताव तयार करून त्यावर कार्यवाही करावी, नुकसानभरपाई देताना अल्पभूधारक, भुभूधारक असा भेदभाव होऊ नये, ज्या शेतकऱ्यांनी विमा भरला नाही त्यांना शासनाच्या आपत्ती निवारण मदत व पुनर्वसन विभागाच्या वतीने मदत देण्याच्या दृष्टीने कार्यवाही करावी कार्यवाही करावी, अतिवृष्टी आणि पुरामुळे खराब झालेल्या रस्ते आणि पुलाच्या दुरुस्तीचे काम ऑक्टोबर अखेरपर्यंत पूर्ण करावे, पूर परिस्थितीमुळे काही ठिकाणी वीज पुरवठा खंडित खंडित झाला आहे तो तातडीने पूर्ववत करावा, धरणातून पाणी सोडल्यानंतर संगमाच्या ठिकाणी पाणी पातळीत वाढ होऊन होणारे नुकसान टाळण्यासाठी कायमस्वरूपी तांत्रिक उपाय योजना कराव्यात आदी सूचना बैठकीदरम्यान संबंधित विभागांना देण्यात आल्या असल्याचीही माहिती पत्रकार परिषदेत दिली.

 

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या