22 C
Latur
Friday, October 7, 2022
Homeउस्मानाबादवाढत जाणारी कोरोना रुग्णांची संख्या चिंता वाढविणारी

वाढत जाणारी कोरोना रुग्णांची संख्या चिंता वाढविणारी

एकमत ऑनलाईन

उस्मानाबाद : कोरोना विषाणूने शहरी भागासह ग्रामीण भागात हातपाय पसरायला सुरूवात केली आहे. दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत चालली असून दि. २२ जुलैअखेर जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या ५८३ झाली आहे. उपचार घेऊन घरी पाठविण्यात आलेले रुग्ण ३५५ असून १९७ रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एकूण ३१ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यात मंगळवारी दि. २२ प्रयोगशाळेतून व रॅपीड टेस्टद्वारे आलेल्या अहवालानुसार १० कोरोना रुग्णांची भर पडली आहे. त्यामध्ये उस्मानाबाद तालुक्यातील चार रुग्णांचा समावेश आहे. त्यामध्ये एक रुग्ण उस्मानाबाद शहरातील मिल्ली कॉलनी, ख्रिस्तीयन इंग्लिश स्कुल जवळचा आहे. दुसरा ख्वॉजानगर गल्ली नंबर १६ येथील तर तिसरा गवळीवाडा (तांबरी विभाग), चौथा तेरखेडा ता. वाशी येथील आहे. उमरगा तालुक्यात सहा रुग्ण आढळून आले आहेत.

त्यामध्ये माशाळकर गल्ली उमरगा शहरातील ३ जणांचा समावेश आहे. मुनशी प्लॉट एक, कुंभार पट्टी एक, उमरगा शहर एक हे आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना विषाणू टेस्टींग लॅब नसल्यामुळे संशयितांचे घेण्यात आलेले स्वॅब अंबाजोबाई येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात येत होते. आता उस्मानाबाद शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ उपकेंद्रात लॅब सुरू करण्यास मान्यता मिळाली आहे. त्यामुळे दररोज मोठ्या प्रमाणात स्वॅब घेतले जाणार असून अहवालही लवकर प्राप्त होणार आहेत.

जिल्ह्यात शहरी भागासह ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. उस्मानाबाद शहर, तुळजापूर शहर, उमरगा शहरात जास्तीचे रुग्ण सापडत असल्याने उस्मानाबाद शहरात १३ ते १९ जुलै दरम्यान संचारबंदी लागू करण्यात आली होती. आता तुळजापूर, उमरगा शहरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाने उपाययोजना केल्या असल्या तरी नागरिकांकडून त्याचे पालन केले जात नाही. शहरी भागात तोंडाला मास्क लावणे, हाताला सॅनिटायझर करणे, सोशल डिस्टन्स पाळला जातो. मात्र ग्रामीण भागात याचे पालन होताना दिसत नाही. त्यामुळे ग्रामीण भागात समुह संसर्गाला सुरूवात झाली आहे. जिल्हाधिकाèयांनी केवळ शहरात संचारबंदी लागू न करता संपूर्ण जिल्ह्यात संचारबंदी लागू करावी अशी मागणी होत आहे.

कंटेनमेंट झोन वाढू लागले
उस्मानाबाद शहर हे जिल्हा मुख्यालयाचे ठिकाण असून शहराची लोकसंख्या जवळपास दिड लाख आहे. इतर जिल्हा शहराच्या तुलनेत शहराचे क्षेत्रफळ लहान आहे. शहरातील बहुतांश भाग कोरोना रुग्ण आढळल्याने कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे. शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या निंबाळकर गल्ली, काळामारुती चौक या भागात रुग्ण आढळल्याने हा भाग सील करण्यात आला आहे. जवळपास संपूर्ण शहराला कोरोनाने वेढा आणला आहे.

Read More  पादुका या शॉर्ट फिल्मचे पोस्टर प्रदर्शित

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या