27.4 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeउस्मानाबादतुळजाभवानी देवीच्या मंचकी निद्रेला सुरुवात

तुळजाभवानी देवीच्या मंचकी निद्रेला सुरुवात

एकमत ऑनलाईन

तुळजापूर : महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजापूरच्या श्री तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्रोत्सवाच्या आधी देवीच्या ९ दिवसीय मंचकी निद्रेला सुरुवात झाली आहे. तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्र उत्सव पूर्वीचा मंचकीनिद्रा तयारीस शनिवारी सकाळी सुवासनीनी एकमेकींना हळदी-कुंकू लावून तुळजाभवानी गादीचा कापूस वेचणे पिंजण्यास सुरूवात केली. आराधी मंडळींनी आराधी गीत गायले.

मुस्लिम धर्मीय पिंजारी कुंटुबीय कापूस पिंजून देतात. त्यांनी कापूस पिंजून दिल्यानंतर निकते कुंटुंबियांनी नवीन कपड्याने तयार केलेल्या ३ गाद्यांमध्ये हा कापूस भरला. इकडे मातेचे शेजघर पलंग खोली पलंगे कुंटुंबियांनी स्वछ घासून, धुवून स्वछ केल्यानंतर चांदीच्या पलंगावर नवार बांधण्यात आल्या. पलंगावर तीन गाद्या तीन लोड ठेवण्यात आल्यानंतर पलंगपोस टाकून बाजूला मखमली पडदे लावण्यात आले. देवीचे शेजघर पलंगे कुंटुंबियांनी पाच वाजता तयार केले.

साडेसहा वाजल्यानंतर देवीजींना भाविकांचे दही, दुध पंचामृताने अभिषेक करण्यात आला. त्यानंतर देवीची मूळमूर्ती स्वछ करण्यात आली. नंतर वाघे कुंटुंबियांनी दिलेली हळद (भंडारा) देवीला लावण्यात आली. देवीची मूळमुख्य मूर्ती भोपे पुजारी वृदांनी हातावर अलगद उचलून ती शेजघरात आणून चांदीच्या पलंगावर निद्रिस्त करण्यात आले. मूर्ती निद्रिस्त आल्यानंतर धुपारती करण्यात आली. त्यानंतर प्रक्षाळपूजा पार पडली आणि तुळजामातेच्या शारदीय नवरात्र उत्सवापूर्वीच्या ९ दिवसीय मंचकी निद्रेस आरंभ झाला. यावेळी देवीजींचे महंत, भोपे, पुजारी, सेवेकरी, मंदिर विश्वस्त, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

श्री तुळजाभवानी देवीच्या मंचकी निद्रा कालावधीत मातेला सकाळ, संध्याकाळ सुगंधी तैलअभिषेक केला जाणार आहे. तुळजामातेची मंचकीनिद्रा चालु असताना पुजारीवृंद विश्रांतीसाठी गादी उशी पलंग याचा वापर करत नाहीत. कारण यावेळी देवीची मंचकी निद्रा सुरु असते.

२६ सप्टेंबरपासून
नवरात्रोत्सवाला आरंभ
यंदा २६ सप्टेंबरपासून नवरात्रोत्सवाला सुरुवात होणार आहे. या दिवशी देवीची घटस्थापना केली जाईल. २६ सप्टेंबर रोजी पहाटे श्री तुळजाभवानी मातेची प्रतिष्ठापना केली जाईल. दुपारी १२ वाजता सिंह गाभा-यात घटस्थापना करण्यात आल्यानंतर देवीच्या शारदी नवरात्रोत्सवाला प्रारंभ होईल.

मंचकी निद्रा म्हणजे काय?
मंचकी म्हणजे पलंग. पौराणिक कथेनुसार नवरात्री आधी देवी योग निद्रेत होती. यावेळी देवांचे महिषासुरासोबत युद्ध सुरू होते. महिषासुराचे वाढते अत्याचार पाहून ब्रम्ह, विष्णू आणि महेश देवीला ८ दिवसांनंतर निद्रेतून उठवतात आणि देवलोकांचे रक्षण करण्याची विनवणी करतात. यावेळी देवी निद्रेतून जागी होऊन घोर रुपात प्रकट होते आणि महिषासुराचा वध करते. त्यामुळे दरवर्षी नवरात्री देवीची मंचकी निद्री पार पडते.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या