24 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeउस्मानाबादबियाणांचे पंचनामे होवून महिना लोटला; पैसे मिळेना

बियाणांचे पंचनामे होवून महिना लोटला; पैसे मिळेना

एकमत ऑनलाईन

पारा : सोयाबीनच्या बोगस बियाणामुळे अनेक शेतकèयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याबाबत प्रशासनाकडून पंचनामेही करण्यात आले. पंचनामा होवून महिना लोटला. मात्र शेतक-यांच्या हातावर अद्याप काहीच पडलेले नाही. त्यामुळे वाशी तालुक्यातील शेतकèयांनी तहसिलदार यांच्याकडे शुक्रवारी (दि. २४) धाव घेवून मागणीचे निवेदन दिले आहे. मागणी मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे.

वाशी तालुक्यातील पारा, फकराबाद, लाखनगाव, qपपळवाडी, शेलु, डोंगरेवाडी, qपपळगाव (को.), सारोळा, सोनेगाव, दसमेगाव, घोडकी, qपपळगाव (qलगी ), मांडवा, झीन्नर या गावांतील शेतकèयांनी जूनमध्ये खरिपाची पेरणीच्या वेळी सोयाबीन या पिकांची पेरणी केली होती. परंतु सदरील बियाणे न उगवल्यामुळे सर्व शेतकèयांचे फार मोठे नुकसान झाले आहे.

या नुकसानीची शासनाने दखल घेऊन कृषी विभागाने पंचनामे करून महिना लोटला. तरीही अजून शेतकèयांना नुकसानीचे पैसे मिळालेले नाहीत. त्यामुळे शासनाने शेतक-यांना नुकसानीचे पैसे त्वरीत द्यावेत, अन्यथा आठ दिवसात तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनात दिला आहे. निवेदनावर नितीन बिक्कड, विजय डोईफोडे, लालासाहेब तांदळे, दिलीप साबळे आदी शेतकèयांच्या स्वाक्षरी आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या