उस्मानाबाद : जिल्हयात कोरोना रूग्णांच्या संख्या दिवसेंदिवस वाढच होत चालली आहे. त्यामुळे जिल्हयातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. शुक्रवारी (दि. ७) दुपारी १ वाजता प्राप्त झालेल्या अहवालात पुन्हा १३० जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. हा आकडा आता २०३० वर गेला आहे. तर आतापर्यंत ६३ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय औरंगाबाद व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्र उस्मानाबाद येथे ३५५ स्वाब पाठविण्यात आले होते. त्यापैकी ३१८ अहवाल जिल्हा रुग्णालय उस्मानाबाद यांना प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये १३० रूग्णांचा अहवाल पॉजीटीव्ह आला आहे. तर निगेटीव्ह रिपोर्ट १५२ व इन्क्लुझिव्ह ३६ व प्रलंबित ३७ जणांचे अहवाल आहेत. त्यामुळे जिल्हयात आता एकुण रूग्णसंख्या २०३० झाली आहे. आतापर्यंत बरे होऊन घरी गेलेले रूग्ण ६५२ तर सध्या परिस्थितीत १३१५ रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तर आतापर्यंत ६३ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी आलेल्या पॉजीटिव्ह अहवालामध्ये उमरगा तालुका- २७, तुळजापूर -४८, कळंब – २८, वाशी – १, परंडा – ७, उस्मानाबाद – १८ रुग्णांचा समावेश आहे.
जिल्ह्यात वाढत्या रुग्णसंख्येमुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक उद्योग धंदे बंद असल्यामुळे हातावर पोट असलेल्या नागरिकांचे हाल होत आहेत. त्यामुळे नाईलाजाने अनेकजणांना घराबाहेर पडावे लागत आहे. पर्यायाने ग्रामीण भागासह शहरातील रस्त्यावर गर्दी होत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील हा आकडा वाढत चालला आहे. अनेक नागरिकांना दवाखान्यासाठी ही घराबाहेर पडावेच लागत आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. मात्र पोटासाठी नाईलाजास्तव धोका पत्करुन घराबाहेर जावे लागत असल्याचे काही नागरिकांमधून सांगण्यात येत आहे.
Read More जिल्ह्यात नव्याने आढळले कोरोनाचे १२ रुग्ण; ८ रुग्णांना डिस्चार्ज