24 C
Latur
Tuesday, October 19, 2021
Homeउस्मानाबाददरही घसरले अन पावसाने सोयाबीनचा झाला चिखल

दरही घसरले अन पावसाने सोयाबीनचा झाला चिखल

एकमत ऑनलाईन

मोहा : संततधार पडत असलेल्या पावसामुळे शेतात कापणी करून ठेवलेली सोयाबीनचे ढिगारे भिजत आहेत. त्यामुळे शेतक-यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काही शेतक-यांनी ढिगारे कापडाने झाकून ठेवली होती, परंतु जमिनीला ओल येऊन पिकाचे नुकसान होत असल्याने शेतकरी चिंताक्रांत झाले आहेत.पावसाळा सुरू झाल्यानंतर सोयाबीन शेंगा भरण्याच्या अवस्थेत असताना जिल्ह्यात पावसाने दडी मारली होती. त्यानंतर मधल्या काळात अचानक पडलेल्या किडीने शेतक-यांच्या तोंडचे पाणी पळाले होते. मात्र पावसाने कमी दिवसांत सरासरी भरुन काढली.

दरम्यान आता पावसाने शेतक-यांची चिंता वाढविली आहे. शेतकèयांनी सोयाबीन पीक काढणीच्या अवस्थेत असताना अचानक पावसाने हजेरी लावल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान होताना दिसत आहे. बुधवार (दि.२२) दुपारी मोहा परिसरात अचानक पावसाने झोडपल्याने शेतक-यांचे काढणीस आलेले सोयाबीन हातचे जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कोरोना महामारीच्या संकटातून संपूर्ण देश भीतीयुक्त वातावरणात जगत असताना कष्टकरी शेतकरी कोरोनाची भीती न ठेवता देशाला धनधान्याने समृद्ध करण्याकरिता रात्रीचा दिवस करीत राबराब राबत आहे. अशातच सोयाबीन घरी येण्याचा स्थितीत असताना बुधवारी (दि.२२) सकाळपासूनच काळे ढगांनी मुक्काम ठोकला होता. दुपारनंतर अचानक ढगातून पावसाने जोरदार हजेरी लावली.

पावसाने शेतातील सोयाबीन कापून पडलेले ओले झाल्याने सोयाबीन पिकाची नासाडी होत पीक मातीमोल झाले आहे. पावसाची सतत एकसारखी धार सुरू असल्याने शेतात जिकडे तिकडे पाणीच पाणी साचल्याने शेतात तलावसदृश्य स्थिती पहायला मिळाली. त्यातच आता सोयाबीन पिकाचे अतोनात नुकसान झाल्याने शेतकèयांसमोरिल संकटाची मालिका सुरूच असल्याचे दिसून येत आहे. सोयाबीनची काढणी सुरू असताना पावसाने बुधवारी जोरदार हजेरी लावली. त्यामुळे काही शेतकèयांचे शेतात सोयाबीन काढून पडले आहे तर, काही शेतकरी मळणी करीत आहेत. पावसाचे पाणी शेतात साचल्याने शेतक-यांच्या हातातोंडाशी आलेला घास पावसाने पळवला आहे. अचानक आलेल्या पावसामुळे परिसरातील शेतीतील सोयाबीन, ज्वारी आणि कपाशीचे नुकसान झाले. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. मूग, उडीद सारखे पीक शेतक-यांच्या हातातून गेल्यानंतर शेतकरी सोयाबीनचा आधार मिळेल अशी अपेक्षा करत होते.

परंतु सोयाबीन काढणी चालू असतानाच परिसरात पावसाने कहर घातल्याने पावसामुळे शेतीतील हाती येणारे पिके म्हणजे सोयाबीन, ज्वारी, कपाशी हे पूर्णतः ओलेचिंब झाले. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहेत. पावसाने काही काळ मध्येच दडी मारल्याने शेतकèयांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले होते. त्यात आता पुन्हा पावसाने संकटांचे ढग अधिकच गडद केले आहेत.

संततधार पावसाने ज्यांच्या शेतात पाणी साचून सोयाबीनचे नुकसान झाले आहे. तसेच पावसामुळे ज्या शेतक-यांचे पीक हातून गेले आहे. अश्या शेतक-यांनी ७२ तासाच्या आत आपली तक्रार फार्म मित्र अ‍ॅप वर नोंदवावी. शेतकèयांनी तक्रार नोंदणी करताना कोणत्या प्रकारची अडचण आल्यास तत्काळ कृषी विभागाशी संपर्क करावा.
– मीरा भिसे, कृषी सहाय्यक, कळंब.

सोयाबीनचे दरात चढ-उतार
गेल्या दोन दिवसातील सोयाबीनचे दर हे शेतक-यांना धडकी भरवणारे आहेत. त्यामुळे अशा परस्थितीमध्ये सोयाबीनची विक्री करावी का साठवणूक यामध्ये शेतक-यांची द्वीधा मनस्थिती होत आहे. चार दिवसापूर्वी सोयाबीनचे दर हे ८ हजार ते ८ हजार ५०० रुपये प्रति क्विंटल होते. त्यामुळे पावसाने नुकसान झाले तरी वाढीव दरामुळे चांगले पैसे मिळतील अशी आशा शेतक-यांना होती.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या