22.9 C
Latur
Tuesday, July 27, 2021
Homeउस्मानाबादग्रामीण भागात कोरोना प्रादुर्भावाचा धोका वाढला

ग्रामीण भागात कोरोना प्रादुर्भावाचा धोका वाढला

एकमत ऑनलाईन

कळंब : कळंब तालुक्यात पाच रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह .आढळल्याने ग्रामीण भागातील जनतेच्या आरोग्य सुविधाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. उपचाराच्या कुठल्याही सुविधा नाहीत. अशा परिस्थितीमध्ये कळंब तालुक्यातील गावागावांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे.

पाथर्डी गावातून दोन तर हावरगाव येथील दोघांना तर कळंब शहरातील एकाला कोरोनाची लागण झाली आहे. आरोग्य सुविधा नसताना धोका निर्माण होणे ही गोष्ट महामारीसाठी सर्वाधिक धोक्याची मानली जाते. कळंब तालुक्यात पुणे, मुंबई हॉटस्पॉट एरिया मधून जवळपास २५४२ लोक आले आहेत. त्यांच्यामुळे कोरोनाचे संकट अधिक गडद झाले आहे.
मुंबई हॉटस्पॉट भागातून लोंढेच्या लोंढे ग्रामीण भागात येत आहेत. पाथर्डी येथे आलेले एक दांपत्य मुंबई येथूनच आलेले आहे. त्यांना कोरोनाची लागण झालेली आहे. हावरगाव येथील दोन महिला मुंबई येथुन आल्या. त्या पॉझिटिव्ह निघाल्या. यामुळे हावरगाव येथील सर्व रस्ते सील करण्यात आले असून गाव बंद करत दूध संकलनही बंद केल्याची माहिती उपसरपंच चक्रधर कोल्हे यांनी दिली.

Read More  कळंबमधील कोरोनाबाधितांच्या संपर्कातील २६ जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने दिलासा

कळंब येथील आरोग्य उपकेंद्रात वीस बेडचे कोव्हिड हॉस्पीटल असून या ठिकाणी व्हेंटेलेटरची सुविधा नाही अशी माहिती वैद्यकिय अधिकारी जीवन वायदंडे यांनी दिली. तसेच ग्रामीण भागातील लोकांसाठी विद्यानिकेतन विद्यालय येरमाळा पन्नास बेड, शहरातील आंबेडकर वस्तीगृह पन्नास बेडचे कोव्हिड हॉस्पिटल निर्माण केले असून तालुक्याचा कारभार सोळा वैद्यकिय अधिकारी, तेवीस समुदाय डॉक्टर, तर ३८ सिस्टरवर असून वैद्यकीय यंत्रणेचा गाडा अपुèया कर्मचाèयांवर हाकला जातोय.

बाहेरून येणारे लोक धोकादायक ठरत असून वैद्यकीय यंत्रणेसमोर मोठे आव्हान उभे राहत आहे. नॉन कोव्हीडसाठी शहरातील तीन खासगी हॉस्पीटल ताब्यात घेवून या ठिकाणी ५६ बेडची व्यवस्था करण्यात आली आहे.
हॉटस्पॉट मुंबई, पुणे, औरंगाबाद येथून ग्रामीण भागात झुंडीच्या झुंडी छुप्या मार्गाने येत आहेत. शासकीय दप्तरी २५४२ लोकांची नोंद असली तरी प्रत्यक्षात छुप्या मार्गाने पाच ते सात हजार लोक आल्याचा अंदाज आहे. या हायरीस्क हॉटस्पॉट भागातून लोक येत असल्याने ग्रामीण भागात धोका वाढतच चालला आहे.

Read More  कळंब येथे कापड दुकानात यात्रेचे स्वरूप, सोशल डिस्टन्सचा बोजवारा

प्रशासनाच्या लक्षात आल्याने उपविभागीय अधिकारी अहिल्या गाठाळ यांनी संबंधित यंत्रणेला सतर्क राहण्याच्या सुचना दिल्या असुन बाहेरूण येणाèयांनी स्वतःहुन तपासणी करून घ्याव्यात असे आवाहन केले आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात सुरुवातीच्या काळात उमरगा तालुक्यात तीन रुग्ण आढळले होते. त्यांच्यावर उपचार होऊन ते पूर्णपणे बरे झाल्याने जिल्हा रेड झोनमधून ग्रीन झोनमध्ये आला होता. राज्य सरकारने रितसर परवानगी देवून लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या लोकांना आपापपल्या गावी जाण्यास संधी दिली आहे. त्यामुळे अनेक नागरिक कोणी परवानगी घेऊन तर कोणी छुप्या मार्गाने गावाकडे येत आहेत. पुणे, मुंबई सारख्या रेड झोन भागातून नागरिक येत असल्याने ग्रामीण भागासह शहरी भागात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. परंडा तालुक्यातील सरणवाडी येथील एक चालक नवी मुंबई येथून आल्यानंतर कोरोना पॉझिटिव्ह निघाला आहे. त्यानंतर कळंब तालुक्यातील पाथर्डी, हावरगाव येथील प्रत्येकी दोन व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह निघाल्या असून ते सर्व मुंबई येथून आलेले आहेत. कळंब शहरातील एका महसूल कर्मचा-यालाही कोरोनाची लागण झाली असून त्याची प्रकृती बिघडल्याने त्याला सोलापूरला हलविण्यात आले आहे.

सर्वांनी काळजी घेतल्यास धोका कमी होऊ शकतो.
पुणे, मुंबई सारख्या शहरातून अनेक नागरिक जिल्ह्यात दाखल होत आहेत. ते गावात दाखल होताच त्यांची आरोग्य तपासणी करून त्यांना शेतात qकवा शाळेत क्वारंटाईन करणे गरजेचे आहे. त्यांच्या घरातील व्यक्तीच्या संपर्कात येवू देवू नये. लहान मुले, महिला, वृद्ध यांना घरातच क्वारंटाईन केले जात असल्याने विशेष खबरदारी घेण्याची गरज आहे. विशेष काळजी घेतल्यास धोका कमी होऊ शकतो.

काळजी घेतल्यास धोका कमी पुणे, मुंबई सारख्या शहरातून अनेक नागरिक जिल्ह्यात दाखल होत आहेत. ते गावात दाखल होताच त्यांची आरोग्य तपासणी करून त्यांना शेतात qकवा शाळेत क्वारंटाईन करणे गरजेचे आहे. त्यांच्या घरातील व्यक्तीच्या संपर्कात येवू देवू नये. लहान मुले, महिला, वृद्ध यांना घरातच क्वारंटाईन केले जात असल्याने विशेष खबरदारी घेण्याची गरज आहे. विशेष काळजी घेतल्यास धोका कमी होऊ शकतो.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
200FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या