31.8 C
Latur
Monday, May 10, 2021
Homeउस्मानाबादविद्यार्थ्यांसाठी शाळेचा रस्ता खडतरच, अनेक शिक्षकांना कोरोनाने घेरले

विद्यार्थ्यांसाठी शाळेचा रस्ता खडतरच, अनेक शिक्षकांना कोरोनाने घेरले

दोन दिवस केलेल्या तपासणीत उघड, एकट्या भोसले हायस्कुलचे 20 शिक्षक पॉझिटिव्ह आढळल्याने खळबळ

एकमत ऑनलाईन

उस्मानाबाद (सुभाष कदम) : राज्य सरकारने 23 नोव्हेंबरपासून नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यास परवानगी दिली असून त्या पार्श्वभूमीवर या वर्गांना अध्यापन करणार्‍या शिक्षकांची आरोग्य विभागाकडून कोरोना चाचणी केली जात आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात शुक्रवारी (दि. 20) आलेल्या अहवालात कोरोना रुग्णांचा आकडा झपाट्याने 87 इतका वाढला आहे. यामध्ये सर्वाधिक शिक्षकांचा समावेश आहे. शिक्षकच कोरोना पॉझिटिव्ह आढळून येत असल्याने जिल्ह्यातील शाळांची वाट विद्यार्थ्यांसाठी बिकट व खडतर असल्याचे दिसत आहे.

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून राज्य सरकारच्या शिक्षण विभागाने काही अटी व शर्ती घालून नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. शाळा सुरू होण्यापुर्वी शिक्षक व कर्मचार्‍यांची कोरोना चाचणी करण्यात येत आहे. काहीही लक्षणे नसताना बहुतांश शिक्षक चाचणीमध्ये कोरोना पॉझिटिव्ह आढळून येत आहेत. गेल्या दोन दिवसापासून जिल्ह्यातील शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक, कर्मचार्‍यांची आरोग्य विभागाच्या पथकामार्फत कोरोना चाचणी करण्यात येत आहे. या चाचणीमध्ये कोणतीही लक्षणे कोरोना पॉझिटिव्ह निघत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

उस्मानाबाद शहरामध्ये श्रीपतराव भोसले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आहे. या विद्यालयातील विद्यार्थी संख्या महाराष्ट्रात सर्वाधिक आहे. विद्यार्थी संख्या मोठी असल्याने साहजिकच शिक्षक संख्याही जास्त आहे. गुरुवारी व शुक्रवारी या विद्यालयातील शिक्षक व कर्मचार्‍यांची कोरोना चाचणी करण्यात आली यामध्ये सर्वाधिक 20 कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. या विद्यालयातील विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी केल्यास मोठ्या प्रमाणात विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आढळून येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे जिल्ह्यात शाळा सुरू होतील की नाही याबाबत साशंकता आहे.

याशिवाय विद्यानिकेतन आश्रम शाळा, शिंगोली आश्रमशाळा, जिल्हा परिषद कन्या प्रशाला तुळजापूर, भारत विद्यालय उमरगा, बसवेश्वर विद्यालय उमरगा, घोगरे हायस्कुल उपळा (मा.), तेरणा हायस्कूल तेर, सरस्वती हायस्कूल बेंबळी या शाळेतील शिक्षक, कर्मचारी शुक्रवारी आलेल्या अहवालात कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने कमी होताना दिसत होती. याला कारणे वेगवेगळी असू शकतील. कोरोना चाचण्या कमी झाल्या हे प्रमुख कारण आहे. शाळा सुरू करण्यासाठी शिक्षक व कमर्र्चार्‍यांची कोरोना चाचणी बंधनकारक केल्याने व त्यांच्या चाचण्या होत असल्याने कोरोना रुग्ण संख्या झपाट्याने वाढताना दिसून येत आहे.

गुरुवारी दि. 19 रोजी 388 जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी 56 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर 2 हजार 117 जणांची रॅपीड अ‍ॅन्टीजेन टेस्ट करण्यात आली होती. त्यामध्ये 27 जण पॉझिटिव्ह निघाले आहेत. यामध्ये उस्मानाबाद तालुक्यातील 41, तुळजापूर 13, उमरगा 11, लोहारा 2, कळंब 9, वाशी 3, भूम 2, परंडा 6 असे एकूण 87 कोरोना रुग्ण आढळून आले आहेत.

शाळेची वाट बिकटच
शाळा सुरु करण्यास शासनाने परवानगी दिल्यानंतर काही कामचुकार शिक्षकांनी संघटनेमार्फत शिक्षक आमदारांशी संपर्क साधून खोडा घालण्यास सुरूवात केली आहे. विद्यार्थ्यांची काळजी हे कारण सांगून शाळा डिसेंबरनंतर सुरू करण्यासाठी शासनावर दबाव आणण्यास सुरूवात केल्याचे दिसत आहे. आता तर शिक्षकच पॉझिटिव्ह आढळून येत असल्याने हे कारण शिक्षकांच्या पथ्यावर पडण्याची शक्यता आहे. शाळा पुढे ढकलण्याची शक्यता आहे.

पाकिस्तानमध्ये १३०० वर्ष जुने मंदिर

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,494FansLike
185FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या