उस्मानाबाद : जिल्ह्यातील शेतकरी दुष्काळ, अवकाळी, गारपीट अशा संकटाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतर्यांच्या आत्महत्येचे सत्र थांबेना झाले आहे. अशीच आत्महत्या उस्मानाबाद तालुक्यातील तावरजखेडा येथील शेतकर्यांने केली आहे. शेतातील पेरणी केलेले पिक उगवले नाही, म्हणून सोमवारी (दि.४) आत्महत्या केल्याचे सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, उस्मानाबाद तालुक्यातील तावरजखेडा येथील शेतकरी संजय शामराव फेरे (वय ४६) यांना अडीच एकर शेती आहे.
त्यांनी त्यांच्या जमिनीवर कोंड येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे ८५ हजार रूपये कर्ज काढले आहे. मात्र पेरणी केलेल्या त्यांच्या अडीच एकर शेतामध्ये सोयाबीन बियाणे उगवले नाही. यातच नैराश्य होवून त्यांनी स्व:ताच्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी (दि. ४) सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे. मयत शेतकर्याच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. सदरील मयत शेतकर्यावर सोमवारी दुपारी तावरजखेडा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.