तुळजापूर : अतिवृष्टीमुळे राज्यावर आजपर्यंतचे सर्वात मोठे संकट ओढावले आहे. यामध्ये फक्त पिकाचे नुकसान झाले नसून ईतरही मोठी हानी झाली आहे. या आर्थिक संकटातून शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी राज्य सरकारला कर्ज काढून मदत करावी लागेल. आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मदतीबाबत विनंती करणार असून राज्याने जास्तीत जास्त कर्ज काढून शेतकऱ्यांना मदत करावी लागणार आहे. असे राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
खा. शरद पवार यांनी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची रविवारी दि. १८ शेतात जाऊन पाहणी केली. या पहाणीच्या अनुषंगाने त्यांनी सोमवारी सकाळी सर्किट हाऊस येथे पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी उस्मानाबाद, लातूर ,सोलापूर ,पुणे या जिल्ह्यातील काही तालुक्यांना अतिवृष्टीचा मोठा फटका बसला आहे, या सर्व तालुक्यातील शेतकऱ्यांच्या व ग्रामस्थांच्या पाठीशी राज्य सरकारने उभे राहणे गरजेचे आहे. यासाठी नुकसान भरपाई निकषात बदल करून जास्तीत जास्त नुकसान भरपाई कशी देता येईल यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
परंतु नुकसान भरपाई देत असताना कुणाचे किती व कसे नुकसान झाले हे पाहण्यासाठी पंचनामे करणे गरजेचे आहे. कारण, कोणालाही आर्थिक मदत देताना ती कशाची आधारे दिली हे पाहणे गरजेचे असते. हंगामी पिकापेक्षा दीर्घकालीन ऊस, द्राक्षे व फळे यांचे फार मोठे नुकसान झाले आहे यांचे नुकसान भरून काढणे शक्य नाही. तरीदेखील या शेतकऱ्यांना कशाप्रकारे दीर्घकालीन मदत करता येईल यासाठी प्रयत्न केले पाहिजे. अतिवृष्टीमुळे फार मोठे आर्थिक नुकसान झाले आहे यासाठी राज्य सरकार बरोबर केंद्र सरकारनेही मदत करणे गरजेचे आहे.
केंद्र सरकार मदत करत नसेल तर राज्य शासनाला कर्ज काढून आर्थिक नुकसान भरपाई द्यावी लागेल. या नुकसानग्रस्त शेतपीक व इतर नुकसान भरपाई बद्दल आपण मुख्यमंत्री ठाकरे यांच्याशी चर्चा करणार असून या सर्व शेतकऱ्यांना व ग्रामस्थांना लवकरात लवकर आर्थिक मदत द्यावी अशी सुचना करणार आहोत असे सांगितले. ऑनलाईन पीक विमा भरणे बाबत अनेक तक्रारी आल्या आहेत या पिक विमा भरण्याबाबत व त्याच्या निकषांबाबत शिथीलता देण्यात यावी अशी मागणी केंद्र सरकारकडे करणार आहे असे त्यांनी सांगितले.
विधानसभा निवडणुकीदरम्यान भाजपमध्ये गेलेल्या नेत्यांना घरवापसीसाठी काही निकष ठरविण्यात आले असून मात्र उस्मानाबाद जिल्ह्यातील नेत्यांना आता राष्ट्रवादी काँग्रेसची दारे बंद असल्याची त्यांनी यावेळी स्पष्ट केले. दिल्या घरी सुखी रहा अशी मिश्किल टिप्पणी करून डॉ. पद्मसिंह पाटील व आ. राणाजगजितसिंह पाटील यांचे नाव न घेता आता पाटील कुटुंबाला राष्ट्रवादीत एन्ट्री नसल्याचे स्पष्ट केले. भाजप नेते एकनाथ खडसे यांच्या संभाव्य राष्ट्रवादी प्रवेशाबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना खा. पवार यांनी उस्मानाबादच्या पाटील परिवाराबद्दल राष्ट्रवादीची भूमिका स्पष्ट केली.
राज्यातील अनेक नेते जे राष्ट्रवादी सोडून गेले, ते परत राष्ट्रवादीत येऊ इच्छित असल्याची चर्चा आहे, असा प्रश्न विचारला असता पवार यांनी काही भागातील नेत्यांबाबत पक्षाने निर्णय घेतला आहे, असे सांगितले. यंदा चांगला पाऊस झाल्याने उस्मानाबाद जिल्ह्यातील उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत तेरणा सारखा मोठा साखर कारखाना सुरू करणे शक्य नाही, मात्र तुळजाभवानी सारखे कारखाने सुरू झाले पाहिजेत, या संदर्भातआपण राज्य सरकार आणि सहकार खात्याशी चर्चा करणार असल्याची माहिती पवार यांनी यावेळी दिली.
बड्या कंपन्या शेतक-यांना गिळंकृत करतील – पवारांनी व्यक्त केली भीती
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्र सरकारने आणलेल्या तीन कृषी विधेयकांसंदर्भात शेतक-यांच्या मनात काय भीती आहे़ यासंदर्भातील भाष्य केले आहे. रिलायन्स, ऍमेझॉनसारख्या मोठ्या कंपन्या सुरुवातीला चांगला भाव देऊन स्पर्धक संपवतील आणि त्यानंतर ते म्हणतील त्याच किंमतीला माल विकण्याची वेळ आपल्यावर येईल, अशा पध्दतीने जणूकाही शेतक-यांना गिळंकृत केले जाणार, अशी भीती शेतक-याला आहे, असे पवार यांनी स्पष्ट केले आहे.
तुळजापूरमधील गव्हर्न्मेंट सर्किट हाउस येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये शरद पवार यांना कृषी विधेयकांसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी किमान आधारभूत किंमत तसेच पंजाब, हरयाणामध्ये अधिक विरोध का होत आहे.
म्हणून शेतक-यांना भीती
सगळ्यांना खरेदी करायची परवानगी दिली आहे ते चांगले आहे. मात्र हे सगळे म्हणजे कोण? ऍमेझॉन ही जगातील सर्वात मोठी कंपनी आहे. रिलायन्स ही या देशातील सर्वात मोठी कंपनी आहे. इथला शेतक-यांना ही भीती वाटतेय की हे मोठे सगळे आता येतील. आता चांगली किंमत देतील. बाकीचे सर्व संपवतील आणि नंतर ते सांगतील त्या किंमतीला मला माल द्यावा लागेल, असे म्हटले आहे.
अँटिव्हायरसच्या नावाखाली चिनी हॅकर्स इन्स्टॉल करतायेत मालवेअर