31.3 C
Latur
Saturday, May 8, 2021
Homeउस्मानाबादजिव्हाळा परिवाराच्या दगडूने मनोरुग्णाला दिले सौंदर्य

जिव्हाळा परिवाराच्या दगडूने मनोरुग्णाला दिले सौंदर्य

एकमत ऑनलाईन

कोरोना ने माणूस रस्त्यावर आला, या महामारी ने गरीब श्रीमंत हा भेद भाव ठेवला नाही.लॉक डाऊन च्या काळात भिकारी, पाला वरचे, मनोरुग्ण यांचे मात्र बेहाल झाले, पण म्हणतात ना नात्याच कुणी नसल तरी देवदूत नेहमी धावून येत असतात. डोक्यावरचे केस वाढलेले, अंगात घान कपडे, अंगाची दुर्गंधी सुटलेली, पोटात अन्न नाही, दारात ही कुणी उभा राहू देत नाही आशा मनोरुग्णाची काळजी कुणी घेत नाही, पण कळंब येथे दगडू झोंबडे यांनी मात्र महामारीची qचता न करता त्या मनोरुग्ण ला जिव्हाळा लावला आणि त्याला माणसाचे रूप दिले.

सोशल मिडियाच्या या काळात समाजामध्ये आपआपल्या परीने वेगवेगळया माध्यमातून समाजातील गरजू आणि वंचित घटकांची सेवा करणारे अनेक जण आपल्याला पहायला मिळतात. काही जण प्रामाणिकपणे मनोभावे सेवा करूनही प्रसिद्धीची कधीही हौस बाळगत नाहीत.

येथील ढोकी रोड लगत एका फायनान्स समोर गेल्या अनेक महिन्यांपासून एक मनोरुग येत असे, त्याला भूक लागल्यावर ती कशी भागवावी हे देखीत समजत नव्हते. पोटाची भूक तो रस्त्यावरील जनावरांना पाणी पिण्यासाठी ठेवलेल्या हौदातील पाणी ओंजळीने पिउन तो भागवताना कळंब येथील छ. शिवाजी महाविद्यालयातील माजी विद्याथ्र्यांच्या जिव्हाळा परिवारातील सदस्य दगडू झोंबाडे यांनी पाहिले यावर त्याची भूक भागवण्यासाठी दररोज स्वतःच्या डब्ब्या सोबत त्यासाठी घरीऊन जेवण आणण्यास सुरवात केली. कधी कधी इतर सोबत्यांच्या उरलेला डब्बा घेऊन त्या मनोरुग्णाला देऊ लागले त्यामुळे त्या मनोरुग्णाला त्यांचा लळा लागला. मग अगदी सुट्टी असली तरी तो तासनतास दगडूची वाट पाहत उभा राही.

तेव्हा दगडू हे करंजकल्ला या त्यांच्या गावाकडे असले तरी काही जण त्यांना फोन करून सांगत तेव्हा दगडू त्या मनोरुणाला गाडीवरून खास डब्बा आणून देत. त्या मनोरूग्णाचे डोळ्याचे दाडीचे केस प्रचंड वाढलेले होते, कपडे ऑईल मध्ये बुडवल्याप्रमाणे काळेकुट्ट, तर अंघोळ त्याला पावसानेच घातलेली. अशा या दगडासारख्या माणसाला जिव्हाळ्याच्या दगडूने सौंदर्य देण्याचे ठरवले त्याने त्या मनोरुग्णाला स्वतःच्या गाडीवर बसऊन ओळखीच्या नाव्हयाकडे घेऊन गेले, आगाऊ रक्कम देऊन ही तिन चार नाव्ह्यांनी त्या मनोरुग्णास हात लावण्यास नकार दिला.

मग कळंब येथील श्रीमंत मंडाळे यांनी एकही रुपयान घेता त्याची दाडी कटींग केली. हे करताना तो मनोरुग्ण अंग झाडत होता तेव्हा दगडू आणि त्यांचे मित्र पिंटू एखंडे यांची दमछाक झाली. शेवटी दाडी, कटींग झाल्यावर दोघांनी त्याला दिवाळीची अंघोळ घातली, नवीन कपडे चढवले पोटभर जेऊ घातले आणि दगडाला दिलेल्या या सौंदर्या सोबत दगडू आणि पिंटू ने एक सेल्फी घेतला. प्रत्येक गावात भिकारी, मनोरुग्ण असतात ते पण माणूस असतात त्यांची काळजी घेण्यासाठी सर्वांना बुध्दी मिळो हेच साकडे या देवदुटने घातले आहे.

मलबार युध्दसरावात ऑस्ट्रेलियाचा समावेश निश्चित

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,493FansLike
182FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या