23 C
Latur
Friday, August 12, 2022
Homeउस्मानाबादशिक्षकाकडून लैंगिक अत्याचार; विद्यार्थीनी गर्भवती

शिक्षकाकडून लैंगिक अत्याचार; विद्यार्थीनी गर्भवती

एकमत ऑनलाईन

कळंब : जिल्ह्यात शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना कळंब तालुक्यात उघडकीस आली आहे. दहावीत शिकणार्‍या अल्पवयीन विद्यार्थिनीवर शाळेतील शिक्षकाने लैंगिक अत्याचार केल्याने ती दोन महिन्याची गरोदर राहिली आहे. पोलीसांनी नराधम शिक्षकाला अटक केली असून न्यायालयाने दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यामध्ये ही घटना घडली आहे. एका नराधम शिक्षकाने दहावीत शिकणार्‍या अल्पवयीन विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केले. गेली अनेक दिवस हा नराधम शिक्षक या मुलीवर लैंगिक अत्याचार करत होता. यात ही मुलगी दोन महिन्याची गर्भवती राहिली. स्कुटीवर प्रवास करत असताना मुलीला अचानक रक्तस्रावाचा त्रास झाला.

त्यामुळे पीडित मुलीच्या घरच्यांनी तिला उपचारासाठी उस्मानाबाद येथील महिला रुग्णालयात दाखल केले असता मुलगी दोन महिन्याची गर्भवती असल्याचे उघड झाले. आपली मुलगी गरोदर राहिल्याचे कळताच कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. त्यांनी मुलीची नीट विचारपूस केली असता नराधम शिक्षकाबद्दल सगळी माहिती दिली. त्यानंतर पीडितेच्य कुटुंबीयांनी कळंब पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली.

स्वतः मुलीनेच या नराधम शिक्षकाविरोधात जबाब दिला. या जबाबनुसार कळंब पोलिसांनी नराधम शिक्षकाला अटक केली. या नराधम शिक्षका विरोधात पोक्सो आणि बलात्कार कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला. आरोपीला कोर्टात हजर केले. न्यायालयाने आरोपीला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान कळंब शहरात अनेक खेडेगावातील मुली शिक्षणासाठी येत असतात. शिक्षकानेच हे कृत्य केल्याने पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या