24 C
Latur
Sunday, September 25, 2022
Homeउस्मानाबादगर्दीचा फायदा घेऊन २ लाख ७० हजारांच्या दागिन्याची चोरी

गर्दीचा फायदा घेऊन २ लाख ७० हजारांच्या दागिन्याची चोरी

एकमत ऑनलाईन

उस्मानाबाद : बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्यांनी एका महिलेच्या पर्समधील २ लाख ७० हजार रूपयांचे दागिने पळविले. सदर घटना येरमाळा बसस्थानकात घडली.

कळंब तालुक्यातील सापनाई येथील राजेंद्र शामराव ताकमोघे हे आपल्या पत्नीसह ४ ऑगस्ट रोजी परतुर-पंढरपूर बसने प्रवास करत होते. सदर बस येरमाळा बसस्थानकात आली असता गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्यांनी ताकमोघे यांच्या पत्नीच्या पर्सची चैन नकळत उघडली. तसेच पर्समधील अंदाजे २ लाख ७० हजार रूपये किंमतीच्या ५० ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या पाटल्या चोरून नेल्या. आपल्या दागिन्याची चोरी झाल्याचे लक्षात येताच राजेंद्र ताकमोघे यांनी येरमाळा पोलीस ठाणे गाठून फिर्याद दाखल केली. त्यावरून अज्ञात चोरट्याविरूद्ध ६ ऑगस्ट रोजी भादंसं कलम ३७९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या