28 C
Latur
Wednesday, April 14, 2021
Homeउस्मानाबादट्रक पलटी होवून पुलाखाली कोसळला; एकाचा मृत्यू

ट्रक पलटी होवून पुलाखाली कोसळला; एकाचा मृत्यू

एकमत ऑनलाईन

उस्मानाबाद : भंगार घेऊन जाणारा ट्रक उलटून उड्डानपुलाखाली पडलेल्या भंगारच्या ढिगा-याखाली दबून ट्रकच्या क्लिनरचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि. १४) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली.

याबाबत माहिती अशी की, कर्नाटकातील गुलबर्गा येथून जालन्याकडे लोखंडाचे भंगार घेऊन दहा टायरचा ट्रक (केए ३२, ए ६११८) जात होता. उस्मानाबाद शहरातील बाह्यवळण मार्गावरील उड्डाणपुलावर ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने भंगाराने खचाखच भरलेला हा ट्रक उड्डाणपुलावर आडवा झाला.

यामध्ये विद्युत खांब कोसळून त्यासोबत ट्रकमधील भंगार रस्त्यावर पुलाखाली पडले. यावेळी धक्का बसून क्लिनरही पडला. नेमके त्याच्याच अंगावर भंगार पडल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. पोलिस वाहतूक शाखेचसह आनंदनगर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन गंभीर जखमींना उपचारासाठी सामान्य रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.अपघातानंतर घटनास्थळावरून पळून जाणा-या ट्रकचालकास वाहतूक शाखेच्या पोलिसांनी एक किलोमीटर अंतरावर पाठलाग करून ताब्यात घेतले.

Read More  एका दिवसात सापडले कोरोनाचे २० रुग्ण

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,473FansLike
162FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या