21.9 C
Latur
Wednesday, November 25, 2020
Home उस्मानाबाद आई राजा उदो उदोच्या गजरात तुळजाभवानी मंदीर परिसर दुमदुमला

आई राजा उदो उदोच्या गजरात तुळजाभवानी मंदीर परिसर दुमदुमला

एकमत ऑनलाईन

तुळजापूर : संबळाच्या कडकडाटात, आई राजा उदो उदोच्या गगनभेदी गजरात, कुंकवाची उधळण करत कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीचे विजयादशमीचे सिमोल्लंघन सोहळा उत्साहात पार पडला. यादिवशी भक्तांची मंदीरात प्रचंड गर्दी होत होती. पण यावर्षी कोरोनामुळे शारदीय नवरात्र महोत्सव साधेपणाने करण्यात आला.

संपूर्ण मंदीर कुंकवाच्या उधळणीने लाल रंगात न्हाऊन निघाले. दशमीला पहाटे ५.४५ वा. अत्यंत उत्साह आणि आनंदी वातावरणात हा अनुपम आणि पारंपारिक दसरा सोहळा साजरा झाला. महिषासुर दैत्याशी नऊ दिवस तुंबळ युद्ध केल्यानंतर देवीने त्याचा खंडेनवमीस वध केला. हा विजयोत्सव साजरा करण्यासाठी विजयादशमी साजरी केली जाते. तत्पूर्वी रविवारी (दि. २५) सायंकाळी भिंगार येथील मानाची पलंग, पालखीचे मध्यरात्री मिरवणुकीने वाजतगाजत त्यांचे प्रस्थान झाले. महाद्वार मार्गाने ही पलंग, पालखी मंदीरात पहाटे दाखल झाली.

मध्यरात्री १२ वा. पूजेची घाट देण्यात आली. १२.३० वा देवीच्या पंचामृत शुद्धस्नान अभिषेकास प्रारंभ करण्यात आला. यावेळी महंत, पाळीकर पुजारी, भोपे पुजारी उपस्थित होते. अभिषेक झाल्यानंतर हळदी कुंकू लावून १.३० वा. ते ४.३० वा. पर्यंत qदड बांधण्यात आली. देवीच्या मुर्तीभोवती देवीचे मुख उघडे ठेऊन १०८ साड्यांचे आवरण बांधण्यास दिंड म्हटले जाते. त्यावर श्वेत वस्त्राचा लेपाटा गुंडाळण्यात आला. आणि देवीची आरती, धुपारती करण्यात आली. त्यानंतर मंदीर संस्थान आणि भोपे पुजारी यांच्या मानाच्या आरत्या पार पडल्या. यानंतर तुळजाभवानीची मूर्ती सिंहासनावरून काढण्यात आली. तेथून ही मूर्ती मंदीरातून बाहेर काढून प्रांगणात आलेल्या नगरच्या मानाच्या पालखीमध्ये ठेवण्यात आली.

संबळाच्या कडकडाटात, उदो उदोच्या गजरात पालखीतून देवीची मुख्य मंदीराभोवती प्रदक्षिणा झाली. सोमवारी पहाटे ६.४५ वा. च्या सुमारास पालखीतून देवीचे पारंपारिक दस-याचे सिमोल्लंघन पार पडले. हा सोहळा पाहण्यासाठी भाविकांनी मंदीरात गर्दी केली होती. आई राजा उदो उदोच्या गजराने परिसर दुमदुमून गेला होता. संपूर्ण मंदीर परिसर कुंकवाने माखला होता. देवीचे सिमोल्लंघन झाल्यानंतर पिंपळाच्या पारावर देवीची पालखी विश्रामासाठी ठेवण्यात आली. त्यानंतर पुन्हा एकदा मंदीर संस्थान आणि भोपे पुजारी यांच्या मानाच्या आरत्या ओवाळण्यात आल्या. देवीस गोड भाताचा नैवेद्य दाखवण्यात आला. सिमोल्लंघनानंतर देवीची लिंबलोण्याने दृष्ट काढून गोड भाताचा नैवेद्य दाखवण्याची परंपरा आहे.

पिंपळाच्या पारावरून पालखी पितळी दरवाजाजवळ आणण्यात आली. पालखीतून मूर्ती काढून सिंह गाभाऱ्यातील नगरहून आलेल्या मानाच्या पलंगावर निद्रिस्त करण्यात आली आणि गाभारा दर्शनासाठी बंद करण्यात आला. सकाळी महंत यांनी मंदीर उघडल्यानंतर ७.३० वा. चरणतीर्थ पूजा झाली. ८ वा. पूजेची घाट झाल्यानंतर देवीचे दिंड सोडविण्यात आले. ८.३० वा. देवीच्या तैलाभिषेकास आरंभ करण्यात आला. यावेळी मंदिरातील धार्मिक कार्यक्रमास मंदिर संस्थानचे तहसीलदार सौदागर तांदळे व मंदिर संस्थानचे सहायक व्यवस्थापक सिध्देश्वर इन्तुले यांच्यासह पाळीकर पुजारी मंडळ, उपाध्ये मंडळ, भोपे, पुजारी मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. यानंतर पलंग, पालखीचे मानकरी नगरचे तेली यांचा मंदीर संस्थानच्या वतीने मंदीर समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला.

चाकूरच्या तरूणांनी बनविले कोरोना योध्द्यांसाठी रेस्पीरेक्टर

ताज्या बातम्या

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांचे निधन

नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांनी वयाच्या 71 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. करोनाची लागण झाल्याने त्यांच्यावर गुरुग्राम येथील मेदांता...

पदवीधरांच्या भाजपा मेळाव्यात कार्यकर्त्यांची गर्दी

लातूर : मराठवाडा पदवीधर मतदार संघ भाजपा व मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार शिरीष बोराळकर यांच्या प्रचारार्थ लातूर जिल्हा भाजपाच्या वतीने दि. २४ नोव्हेंबर रोजी...

धुमाळ यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

कासार सिरसी (नागेश पंडित ) : निलंगा तालुक्यातील नेलवाड येथील भारतीय सैन्य दलातील जवान अर्जुन (लखन) किसनराव धुमाळ (वय २४) हे कश्मीर खो-यात दोन...

क्रिकेटमध्येही घराणेशाही!

मुलाने आपली गादी चालवावी असे प्रत्येक बापाला वाटणे हा मानवी स्वभाव आहे. किमान भारतीयांना तरी तसे वाटू शकते. अर्थात याला अपवादही असू शकतात. डॉक्टरच्या...

अनमोल हिरा

कोरोनाच्या साथीने आपल्यातून हिरावून नेलेला आणखी एक अनमोल हिरा म्हणजे ख्यातनाम बंगाली अभिनेते सौमित्र चटर्जी. सहजसुंदर अभिनयासाठी ते जितके ख्यातकीर्त होते, त्याहून अधिक ख्याती...

ऑनलाईन सहशालेय शिक्षण

देशासह राज्यात कोविड-१९ या आजाराचा शिरकाव होताच मार्च महिन्यात सर्वत्र लॉकडाऊन सुरू झाले. यामुळे शाळांना सुटी मिळाली व ती देखील अनिश्चित कालावधीसाठी वाटू लागली....

आयुर्वेदाचा विस्तार गरजेचा

गेल्या काही महिन्यांपासून आरोग्यविषयक चिंता वाढल्याने तसेच वाढत्या आव्हानांमुळे संबंधित तज्ज्ञ आणि संस्थांचे लक्ष पुन्हा एकदा पारंपरिक चिकित्सा प्रणालींच्या उपयुक्ततेकडे वळले आहे. आधुनिक जीवनशैलीमुळे...

धानउत्‍पादक शेतक-यांना प्रतिक्‍विंटल ७०० रूपयांचा बोनस !

मुंबई,दि.२४ (प्रतिनिधी) धानउत्‍पादक शेतक-यांना दिलासा देण्यासाठी केंद्राच्या दराव्यतिरिक्‍त प्रतिक्‍विंटल ७०० रूपये बोनस देण्याचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. यामुळे धानउत्‍पादक शेतक-याला २...

राज्‍यात पुन्हा लॉकडाउन करण्याबाबत कोणतीही चर्चा नाही – राजेश टोपे यांचे स्पष्टीकरण

मुंबई,दि.२४ (प्रतिनिधी) देशातील अन्य राज्‍यांच्या तुलनेत महाराष्‍ट्रातील परिस्‍थिती निश्चितच समाधानकारक आहे. त्‍यामुळे राज्‍यात लॉकडाऊन करण्याची सध्यातरी गरज नाही. तशी चर्चाही झालेली नाही. मात्र काही...

जयसिंगराव गायकवाड यांचा राष्‍ट्रवादीत प्रवेश

मुंबई,दि.२४ (प्रतिनिधी) स्व. प्रमोद महाजन व गोपीनाथ मुंडे यांचे एकेकाळचे खंदे सहकारी व भाजपचे माजी खासदार जयसिंगराव गायकवाड यांनी भाजपाला सोडचिठठी देऊन राष्‍ट्रवादी काँग्रेसमध्ये...

आणखीन बातम्या

उमेदवार चव्हाणांच्या प्रचार फलकातून बसवराज पाटील गायब

उस्मानाबाद (मच्छिंद्र कदम) : औरंगाबाद पदवीधर मतदार संघ निवडणूकीची सध्या मराठवाड्यात रणधुमाळी जोरात सुरु आहे. या मतदार संघातील प्रत्येक जिल्ह्यात महायुती, महाविकास आघाडी याबरोबरच...

पहिल्याच दिवशी ४४५ शाळा सुरू; ११७३३ विद्यार्थ्यांची हजेरी

उस्मानाबाद : जिल्ह्यात मागील आठ महिन्यानंतर सोमवारी (दि.२३) पहिल्या दिवशी शाळा सुरु झाल्या आहेत. कोरोना भिती असतानाही जिल्ह्यातील पहिल्याच दिवशीश ४४५ शाळा सुरु झाल्या...

उस्मानाबाद, भूममध्ये भाजपाकडून वीज बिलाची होळी

उस्मानाबाद : लॉकडाऊन काळातील वीज बिल माफ करावे, या मागणीसाठी भाजपाच्या वतीने सोमवारी (दि.२३) उस्मानाबाद व भूम शहरात वीज बिलाची होळी करुन सरकारचा निषेध...

‘स्पायनल मस्क्युलर ऍट्रोफी’ या आजारासाठी जीन थेरपी देणारे डॉ.विवेक मुंदडा हे युएई देशातील पहिले भारतीय डॉक्टर

कळंब : 'स्पायनल मस्क्युलर ऍट्रोफी' हा एक गंभीर आणि अनुवांशिक आजार आहे.या आजारासाठी जीन थेरपी देणारे उस्मानाबाद जिल्ह्यातील शिराढोण ता.कळंब येथील डॉ.विवेक बद्रीनारायण मुंदडा...

निवडणूक घेऊन तेरणाचा हंगाम सुरू करा

उस्मानाबाद : मराठवाड्यातील पहिला सहकारी साखर कारखाना असलेला तेरणा कारखाना मागील १० वर्षांपासून चक्क बंद आहे. त्यामुळे हजारो कुटुंबांच्या अर्थकारणाला मोठी खीळ बसली आहे....

हजारो करदात्यांकडून पीएम किसान योजनेत कोट्यावधीची लूट

उस्मानाबाद (मच्छिंद्र कदम ) : जिल्ह्यात पीएम किसान योजनेचा पात्र नसतानाही हजारो करदात्या शेतकèयांनी कोट्यावधीची लूट केली आहे. या लुटारुमध्ये जिल्ह्यातील नामवंत धनदांडगे डॉक्टर,...

राज्य सरकारमध्ये कोणाचा कोणाला ताळमेळ लागेना

उस्मानाबाद : सध्याचे सरकार शाळा चालु करायच्या का नाही, विज बिले कमी करायचे का नाही, १०० युनिट मोफत द्यायचे का नाही, याबाबत गोंधळलेली आहे....

जिल्ह्यात तीन ठिकाणी घरफोडी; लाखोंचे दागिन्यासह रोकड पळविली

उस्मानाबाद : जिल्ह्यात घरफोडी, लुटालूट, दरोडे, हाणामारी यासारख्या घटना सुरुच आहेत. दिपावलीनिमित्त घरातील नागरिक गावाकडे गेल्याचा फायदा घेवून घरफोडी होत आहेत. उस्मानाबाद शहरातील आदर्शनगर...

जिल्ह्यातील ९ ते १२ वी पर्यंतच्या शाळा उद्यापासून सुरु : जिल्हाधिकारी दिवेगावकर

उस्मानाबाद : जिल्ह्यातील ज्या शाळांमध्ये विद्यार्थी त्यांचे स्वत:चे घरुन येणे-जाणे करतात. अशा शाळांमधील इयत्ता ९ वी ते इयत्ता १२ वी चे वर्ग सोमवारी (दि.२३)...

विद्यार्थ्यांसाठी शाळेचा रस्ता खडतरच, अनेक शिक्षकांना कोरोनाने घेरले

उस्मानाबाद (सुभाष कदम) : राज्य सरकारने 23 नोव्हेंबरपासून नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यास परवानगी दिली असून त्या पार्श्वभूमीवर या वर्गांना अध्यापन करणार्‍या शिक्षकांची...
1,347FansLike
121FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या

मोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या

सोलापूर : प्रेमसंबंध घरातील व नातेवाईकांना समजेल या भीतीपोटी प्रेमी युगुलाने एकाच लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नरखेड गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली. प्रशांत...

लातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात

लातूर : तब्बल ८६ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर येथील पापविनाशक मंदिरातील चालुक्य कालीन शिलालेखाच्या दोन भागांचे वाचन करण्यात आले असून त्यातून लातूर नगरीचे समृद्ध आध्यात्मिक, बौद्धिक...

अमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर

अमोल अशोक जगताप आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले व्यंकटेश पप्पांना डंबलदिनी वय 47 खंडू सुरेश सलगरकर वय 28 दशरथ मधुकर कसबे वय 45 लक्ष्‍मण उर्फ काका...

पानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन

पानगाव : ग्रामपंचायतच्या ढिसाळ कारभाराचा निषेधार्थ मनसे तालुका उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य इम्रान मणियार व मनसे शहराध्यक्ष तथा पानगाव ग्रामपंचायत सदस्य चेतन चौहान यांच्या...

काँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध

सोलापुर :  मुस्लिम शासक तुघलकाप्रमाणे चित्र विचित्र निर्णय घेऊन देशाच्या अर्थव्यवस्थेची वाट लावणाऱ्या, युवकांना बेरोजगार करणाऱ्या, उद्योगधंदे बंद पाडणाऱ्या, नोटबंदीचा चुकीचा निर्णय घेणाऱ्या, सरकारी...

सुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी

ओमकार सोनटक्के जळकोट : तालुक्यातील अतिशय डोंगरी भागात तिरु नदीच्या काठी सुल्लाळी हे लहानसे खेडेगाव आहे परंतु मनात जर जिद्द असेल आणि काही करून...

धक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर

लातूर शहरात सापडले सर्वाधिक रुग्ण : लातूर-२५, अहमदपूर-८, निलंगा-७, औसा-६, देवणी-६, उदगीर-६ : काळजी घ्या; मास्क वापरा, गर्दीची ठिकाणे जाण्याचे टाळा लातूर : जिल्ह्यातून गुरुवारी...

६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी -अमित विलासराव देशमुख

सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांची माहिती मुंबई - चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी उद्योग यांच्याशी सहयोगी असलेल्या ६५ वर्षांवरील कलाकार/क्रू सदस्यांना कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर आवश्यक...