21.1 C
Latur
Tuesday, March 9, 2021
Home उस्मानाबाद वाशी येथील आठवडी बाजार बनला दारुड्यांचा अड्डा

वाशी येथील आठवडी बाजार बनला दारुड्यांचा अड्डा

एकमत ऑनलाईन

वाशी : वाशी येथील बाजार समिती परिसर दारुड्यांचा अड्डा बनला आहे. बाजार कट्ट्यावर दारुंच्या बाटल्याचा खच पडत आहे. ही घाण भाजीपाला विकणाèयांना काढावी लागत आहे. दारूच्या बाटल्या व त्याचे काच, इतर ग्लास, पाण्याची बॉटल हा सर्व कचरा भाजीपाला विक्रेत्यांना काढावा लागत आहे. दारू विक्रेत्यांकडे दारू पिण्यास मनाई असल्याने बाजार कट्ट्याचा उपयोग दारू पिण्यासाठी दारुड्यांकडून केला जात आहे.

कोरोणाच्या पाश्र्वभूमीवर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये भरणारा आठवडी बाजार बंद करण्यात आलेला आहे. या ठिकाणी सकाळच्यावेळी शेतकरी व काही व्यापारी भाजीपाला विक्रीसाठी बसतात. हे भाजीपाला विक्रेते ठराविक वेळ याठिकाणी बसून नंतर आपापल्या घरी निघून जातात. कोरोणाच्याच पाश्र्वभूमीवर अगोदर येथील दारू दुकाने बंद करण्यात आली होती. नंतरच्या काळामध्ये देशी दारू विक्रेते व बिअर बार यांना दारू विकण्याची परवानगी देण्यात आली. दारू विकण्याची परवानगी देत असताना बिअर बार किंवा देशी दारू दुकान या ठिकाणी गर्दी होऊन कोरोणाचा संसर्ग वाढू नये यासाठी या दुकानातून केवळ पार्सल विकण्याची परवानगी देण्यात आली.

देशी दारूचे दुकान किंवा बिअर बार या ठिकाणी दारू पिण्याची परवानगी नसल्यामुळे अनेकांची दारू पिण्याची पंचायत झाली. काही मोजकेच लोक असे आहेत की ते आपल्या घरी दारू घेऊन जाऊन दारू पिऊ शकतात मात्र अनेक जण असे आहेत की ते घरी दारू नेऊन पिऊ शकत नाहीत.अशा परिस्थितीमध्ये मद्यपी लोक शहरातील मोकळी जागा, अर्धवट पडलेले बांधकाम याचा आसरा घेऊन आपल्या दारू पिण्याची हौस भागवत आहेत. काहीं मद्यपीने तर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये आठवडी बाजारासाठी बांधण्यात आलेल्या कट्ट्याला आपल्या दारू पिण्याचे ठिकाण बनवले आहे. संध्याकाळच्या वेळेला हे दारू पिणारे लोक या ठिकाणी दारूच्या बाटल्या, पाणी, ग्लास व इतर काही साहित्य घेऊन या ठिकाणी जातात.

दारू पिऊन झाल्यानंतर या ठिकाणी दारूच्या बाटल्या फेकून दिल्या जातात किंवा कट्ट्यावरचे ठेवल्या जातात. याबरोबरच काही बाटल्या फोडून त्या ठिकाणीच ठेवल्या जातात. दारू पिण्यासाठी आणलेले प्लास्टिक क्लास, पाण्याची बॉटल या ठिकाणी सोडून हे लोक निघून जातात. दुसèया दिवशी हीच घाण भाजीपाला विक्रेत्यांना काढून या ठिकाणी भाजीपाला विकण्यासाठी बसावे लागते. दारुड्यांनी बाजार कट्ट्याला आपला अड्डा बनवलेला आहे ही बाब योग्य नसून या बाबीकडे नगरपंचायतीने लक्ष देऊन दारू पिणारांचा बंदोबस्त करावा. अशी मागणी भाजीपाला विक्रेत्यांबरोबर नागरीकातून होत आहे.

IPL 2020 : आयपीएल स्पॉन्सरशीपसाठी रामदेव बाबांची उडी

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,444FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या