27.7 C
Latur
Wednesday, September 23, 2020
Home उस्मानाबाद खामसावडीच्या तरुणाने कोरोनात यशस्वी ड्रॅगन शेती फुलवली

खामसावडीच्या तरुणाने कोरोनात यशस्वी ड्रॅगन शेती फुलवली

एकमत ऑनलाईन

उस्मानाबाद : कोरोनाच्या काळात संपूर्ण जग एकीकडे रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्याचे प्रयत्न करत आहेत. तर दुसरीकडे जिल्ह्यातील शेतकरी शेतीत नवनवीन प्रयोग यशस्वी करत आहेत. त्यातच उस्मानाबाद तालुक्यातील खामसवाडी येथील तरुण शेतकरी प्रशांत नामदेव माने यांनी ड्रॅगनची शेती करुन यशस्वी पिक घेतले आहे. माने यांच्या या पिकाची कृषीदुत प्रसाद भोसले व ज्ञानेश्वर ढवळे यांनी माहिती घेतली असून अनेक शेतक-यांनी या शेतीचा प्रयोग करावा असे प्रतिपादन केले.

बी.ए. डी. एड. पर्यंतचे शिक्षण घेतलेले उच्च शिक्षित प्रशांत माने नोकरीच्या मागे न लागता वडिलोपार्जित चौदा एकर जिरायती शेतीतच अभिनव प्रयोग करण्याच्या उद्देशाने जून २०१९ मध्ये ड्रॅगन शेतीत उतरले. ग्रामीण जागरूकता व कृषी आधारीत उद्योग उपक्रमाअंतर्गत उस्मानाबाद तालुक्यातील खामसवाडी येथे कार्यक्रम अधिकारी डॉ.सुधीर शिंदे, डॉ.कारंडे व कार्यक्रम नियंत्रक डॉ. सुधाकर qनबाळकर, डॉ. विजय तरडे आणि डॉ. सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली कृषीदूत प्रसाद भोसले व ज्ञानेश्वर ढवळे हे गेल्या दीड महिन्यांपासून शेतक-यांच्या बांधावर ग्रामीण जागरूकतेचे व विस्ताराचे शिक्षणाचे कार्य करत आहेत. त्यांच्या माध्यमातून माने यांनी शेती उभारली आहे.

कोरोनाच्या कालखंडात संपूर्ण जग एकीकडे रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्याचे प्रयत्न करत आहेत. तर दुसरीकडे शेतकरी शेतीत नवनवीन यशस्वी प्रयोग करत आहेत. त्यातीलच खामसवाडीचे तरुण शेतकरी प्रशांत नामदेव माने हे आहेत. माने यांच्या शेतीस भेट देवून कृषीदुत प्रसाद भोसले व ज्ञानेश्वर ढवळे यांनी माहिती घेतली आहे. तसेच अनेक शेतकèयांनी या शेतीचा प्रयोग करावा असे प्रतिपादन केले. बी.ए. डी. एड. पर्यंतचे शिक्षण घेतलेले उच्च शिक्षित प्रशांत माने नोकरीच्या मागे न लागता वडिलोपार्जित चौदा एकर जिरायती शेतीतच अभिनव प्रयोग करण्याच्या उद्देशाने जून २०१९ मध्ये ड्रॅगन शेतीत उतरले. प्रशांत माने यांच्या मते, मुख्यतः मॅक्सिको, थायलंड, अमेरिका येथील हे निवडुंग वर्गीय फळपीक भारतातही मोठ्या प्रमाणावर लागवड होत आहे. हलक्या ते मध्यम प्रकारच्या जमिनीत व अत्यल्प किंवा कमी पाण्यावर येणारे हे पीक त्यांनी अर्धा एकर रानावर ८१२ मी एवढ्या अंतराने लागवडीखाली घेतले आहे. झाडास आधारची गरज असल्याने सिमेंटच्या खांबाभोवती प्रत्येकी चार याप्रमाणे रोपे त्यांनी अर्धा एकरात लावली आहेत.

आंतरपीक म्हणून त्यात सोयाबीन, हरभरा पिकांची ते लागवड करतात. ठिबक सिंचनाद्वारे आठवड्यातून एकदाच ते या बागेस पाणी देतात. साधारणतः लालसर असणारे हे फळ प्रत्येक झाडास १५ ते २० याप्रमाणे जुलै ते डिसेंबर या कालावधीत तोडण्यास येते. भारतीय बाजारात १५० ते २५० रुपये किलो विकले जाणा-या या पिकाच्या माध्यमातून त्यांना वार्षिक तीन ते चार लाख निव्वळ नफा मिळवल्याचे सांगितले. या पिकाच्या सौरचनेनुसार व निवडुंग प्रकारातील असल्याने यावर कोणत्याही प्रकारची कीड व रोग यांचा प्रादुर्भाव पडत नसल्याने प्रशांत माने संपूर्णतः सेंद्रिय पद्धतीने या पिकाची लागवड केली आहे.

ड्रगनची औषधी गुणधर्म
बहुआयामी फळ ड, क, ब १, ब २ व ब ३ आदी जीवनसत्वानीयुक्त असून त्यात लोह, कॅल्शियम, फॉस्फरस ही खनिखे विपुल प्रमाणात आहेत. त्यामुळे हृदय, रक्तवाहिन्याचे आरोग्य, कॉलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवते. अपायकारक किरणे व कॅन्सर पेशींना नियंत्रित ठेवते. विपुल फायबर असल्याने त्यात मधुमेह नियंत्रित ठेवण्यास सहाय्यक आहे. तसेच त्वचा, रोगप्रतिकारक शक्ती, हाडे, पचनसंस्था, चेतासंस्था, डोळे आदीच्या आरोग्यासाठी लाभदायक आहे.

दुष्काळग्रस्त जिल्ह्यासाठी वरदान
निवडुंग प्रकारातील हे फळझाड मराठवाड्यासारख्या कमी पर्जन्यमान, उष्णकटिबंधीय प्रदेशात अत्यल्प किंवा कमी जलसिंचनाखाली घेता येते. त्यामुळे उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतक-यांसाठी नामी सुवर्णसंधीच आहे, असे प्रशांत माने यांनी सांगितले.

सोलापूर ग्रामीणमध्ये ४१५ कोरोनाबाधित तर १४ जणांचा मृत्यू

ताज्या बातम्या

सतत होणाऱ्या बंद मुळे व्यापारी व व्यवसाय धारकांचे कंबरडे मोडले, दुकानदारतून तीव्र नाराजी

श्रीपुर (दादा माने) : श्रीपुर ता माळशिरस गेल्या सहा महिन्यांपासून सर्वत्र कोरोनाने थैमान घातले आहे त्यामुळे गेली तीन महीने छोटे मोठे व्यवसाय पुर्णपणे बंद...

बंँक अधिकार्‍यांच्या बैठकीत कर्जासाठी त्रस्त झालेल्या शेतकर्‍याने रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा केला प्रयत्न

मंगळवेढा : मंगळवेढा पंचायत समितीमध्ये राष्ट्रीयकृत बंँक अधिकार्‍यांची शेतकर्‍यांच्या समवेत कर्जाविषयी बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत चक्क कर्जासाठी त्रस्त झालेल्या एका शेतकर्‍याने अंगावर...

पंढरपुरात कलावंतांचे विविध मागण्यांसाठी आंदोलन

पंढरपूर : कलावंतांना कार्यक्रमांची परवानगी देण्यात यावी, कोरोनाच्या संकटामुळे काही महिन्यांपासून जत्रा, यात्रा, उत्सव बंद आसल्याने अडचणीत सापडलेल्या कलावंतांना तात्काळ आर्थिक मदत देण्यात यावी....

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात चार वर्षे बीएड करणार्‍यांनाच या नोकरीस पात्र ठरवले जाईल

जुन्या पदवी धारकांना 2030 नंतर शिक्षकाची नोकरी मिळणार नाही नवी दिल्ली, वृत्तसंस्था : राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात बीएडला चार वर्षे करण्यात आली आहेत. जुन्या पदवी धारकांना 2030...

‘केम छो वरळी’ : परीसरातील अनेक चाळींमध्ये लोकांच्या घरात पाणी शिरलं

एक व्हिडीओ मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी केला  ट्वीट ; मुंबईत प्रचंड पाऊस : वरळी परीसरातील अनेक चाळींमध्ये घरात पाणी शिरलं मुंबई : मुंबईमध्ये काल...

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या नागरिकांना शासनाकडून नुकसान भरपाई मिळवून देणार -आमदार शहाजीबापू पाटील

चिकमहुद (वैभव काटे) : सांगोला तालुक्यांमध्ये दिनांक 16 सप्टेंबर व 17 सप्टेंबर रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले असून अनेक जनावरे दगावली...

शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोना संसर्ग

मुंबई : राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचं स्पष झालंय. त्यांनी स्वतःच ट्वीट करत याबाबत माहिती दिली. यावेळी वर्षा गायकवाड म्हणाल्या, 'नमस्कार,...

अशा आरोपांमुळे माझी प्रतिमा बिघडवली जात आहे-दीया मिर्झा

मुंबई : सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणाशी संबंधीत ड्रग्ज केसमध्ये अनेक मोठ्या कलाकारांची नावे समोर येत आहे. ड्रग्ज कनेक्शनप्रकरणी अभिनेत्री दीपिका पादुकोण पाठोपाठ अभिनेत्री...

लातूर जिल्ह्यात २४० नवे रुग्ण; रुग्णसंख्येची गती मंदावली

लातूर : गत आठवड्याच्या तुलनेत या आठवड्याच्या सुरुवातीला म्हणजेच दि. २१ सप्टेंबरपासून जिल्ह्यातील रुग्णसंख्येची गती मंदावल्याचे आढळून आले असून, मंगळवार दि. २२ सप्टेंबर रोजी...

राजस्थानचा रॉयल विजय; चेन्नई संघाला हे आव्हान पेलवले नाही

शारजा : संजू सॅमसन आणि कर्णधार स्टिव्ह स्मिथ यांनी केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने २१६ धावांचा डोंगर उभा केला. परंतु सॅमसन माघारी परतल्यानंतर राजस्थानच्या...

आणखीन बातम्या

चिंचोली येथे कु-हाडीचे घाव घालून पतीकडून पत्नीचा खून

उस्मानाबाद : चारित्र्याच्या संयशावरुन पतीकडून झोपत असलेल्या पत्नीच्या मानेवर कु-हाडीने सपा-सप वार करुन खून केला. ही खळबळजनक घटना उमरगा तालुक्यातील चिंचोली येथे मंगळवारी (दि.२२)...

केंद्र सरकारच्या कृषी विधेयकामुळे शेतक-यांना लाभ – रामदास कोळगे

उस्मानाबाद : केंद्र सरकारने लोकसभा व राज्यसभेमध्ये मंजूर केलेले तीन विधेयक हे शेतक-यांच्या हिताचे असून यामुळे शेतक-यांना शेतीमाल विक्रीची हमी व कृषि प्रक्रिया प्रकल्प...

मुरुममध्ये मराठा क्रांती मोर्चा समितीकडून जागर-गोंधळ

मुरूम : मराठा आरक्षणासाठी मुरुम शहरात मंगळवारी (दि. २२) छत्रपती शिवाजी महाराज चौकात मराठा क्रांती मोर्चा समितीच्या वतीने जागर गोंधळ आंदोलन करण्यात आले. यावेळी...

मांजरा नदी पाणी प्रवाहात अडचणी वाढल्याने धरण भरण्यास अडचण

कळंब (सतीश टोणगे): बीड, लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील ७२ गावांचा पाणी पुरवठा अवलंबुन असलेल्या मांजरा धरणास पाणी पुरवठा करणा-या मांजरा नदीचा पाणी प्रवाह कमी...

बोगस बियाणे प्रकरण; अद्यापही ९४६७ शेतकरी वा-यावर

उस्मानाबाद (मच्छिंद्र कदम): जिल्ह्यात सोयाबीन काढणीस आली, तरी अद्यापही सोयाबीनच्या बोगस बियाण्यांमुळे पिकाची उगवण न झाल्याप्रकरणी जिल्ह्यातील केवळ ११०४ शेतक-यांना नुकसान भरपाई मिळाली आहे....

मराठा आरक्षणाला अंतरिम स्थगिती; भाजपाचा मराठा द्वेष झाला उघड

उस्मानाबाद : भारतीय जनता पाटी व राष्ट्रीय स्वयसेवक संघ यांचा मराठा द्वेष लपूच शकत नाही, सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाला दिलेली अंतिरीम स्थगिती ही भाजपचा...

जिल्ह्यातील ३४ प्रकल्प हाऊसफुल्ल, तेरणासह ५ मध्यम प्रकल्प ओसंडू लागले

उस्मानाबाद (मच्छिंद्र कदम): जिल्ह्यात मागील आठ दिवसापासून दमदार पाऊस झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील २९ लघु तर ५ मध्यम प्रकल्प ओसंडून वाहू लागले आहेत. मध्यम...

परंडा उपजिल्हा रुग्णालयात व्हेंटिलेटर धुळखात पडून

परंडा : केंद्रसरकार कडून आलेले व्हेंटिलेटर परंडा येथील उपजिल्हा रुग्णालयात धुळखात पडून आहे. कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाल्यावर व्हेंटिलेटरचा वापर करणार का? असा सवाल भाजपा तालुकाध्यक्ष...

परांडा तालुक्यातील उंडेगाव येथे शेतकऱ्याची गळफास लावून आत्महत्या

आंबी : याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी आहे की दि .२०/०९/२०२० रोजी , संपत्ती लक्षीमन कदम ( मायताचे मामा ) वय ५०वर्ष रा...

तिर्थ क्षेत्र तुळजापूरची तहान भागविणाऱ्या बोरी धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ

नळदुर्ग (सचिन गायकवाड) : तिर्थ क्षेत्र तुळजापूर नळदुर्ग अणदूर सह आसपासच्या गावाची तहान भागवणाऱ्या ३५ दशलक्ष घनमीटर साठवणक्षमता असलेल्या ( कुरनूर मध्यम प्रकल्प नळदुर्ग...
1,258FansLike
117FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या

मोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या

सोलापूर : प्रेमसंबंध घरातील व नातेवाईकांना समजेल या भीतीपोटी प्रेमी युगुलाने एकाच लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नरखेड गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली. प्रशांत...

लातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात

लातूर : तब्बल ८६ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर येथील पापविनाशक मंदिरातील चालुक्य कालीन शिलालेखाच्या दोन भागांचे वाचन करण्यात आले असून त्यातून लातूर नगरीचे समृद्ध आध्यात्मिक, बौद्धिक...

अमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर

अमोल अशोक जगताप आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले व्यंकटेश पप्पांना डंबलदिनी वय 47 खंडू सुरेश सलगरकर वय 28 दशरथ मधुकर कसबे वय 45 लक्ष्‍मण उर्फ काका...

पानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन

पानगाव : ग्रामपंचायतच्या ढिसाळ कारभाराचा निषेधार्थ मनसे तालुका उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य इम्रान मणियार व मनसे शहराध्यक्ष तथा पानगाव ग्रामपंचायत सदस्य चेतन चौहान यांच्या...

काँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध

सोलापुर :  मुस्लिम शासक तुघलकाप्रमाणे चित्र विचित्र निर्णय घेऊन देशाच्या अर्थव्यवस्थेची वाट लावणाऱ्या, युवकांना बेरोजगार करणाऱ्या, उद्योगधंदे बंद पाडणाऱ्या, नोटबंदीचा चुकीचा निर्णय घेणाऱ्या, सरकारी...

सुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी

ओमकार सोनटक्के जळकोट : तालुक्यातील अतिशय डोंगरी भागात तिरु नदीच्या काठी सुल्लाळी हे लहानसे खेडेगाव आहे परंतु मनात जर जिद्द असेल आणि काही करून...

धक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर

लातूर शहरात सापडले सर्वाधिक रुग्ण : लातूर-२५, अहमदपूर-८, निलंगा-७, औसा-६, देवणी-६, उदगीर-६ : काळजी घ्या; मास्क वापरा, गर्दीची ठिकाणे जाण्याचे टाळा लातूर : जिल्ह्यातून गुरुवारी...

६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी -अमित विलासराव देशमुख

सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांची माहिती मुंबई - चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी उद्योग यांच्याशी सहयोगी असलेल्या ६५ वर्षांवरील कलाकार/क्रू सदस्यांना कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर आवश्यक...