20.4 C
Latur
Thursday, January 21, 2021
Home उस्मानाबाद गावात नाही नेट आणि शिक्षक म्हणतात ऑनलाईन भेट

गावात नाही नेट आणि शिक्षक म्हणतात ऑनलाईन भेट

एकमत ऑनलाईन

पारा : कोरोना हा संसर्गजन्य रोग सर्वांच्या मुळावर उठला असून या आजाराने मृत्युच्या प्रमाणापेक्षा जास्ती भीती व नुकसानीने जास्त लोक मरू लागले आहेत. लोकांची ही सहनशीलता संपू लागली आहे. शिक्षण क्षेत्रात तर खूप मोठे नुकसान झाले आहे. परीक्षा रद्द झाल्या. शिक्षण बंद झाले. शाळांच्या खोल्या बंद पडल्या. शाळेचे मैदान गवत झाडेझुडपाने भरले. लहान लेकरे, छोटे विद्यार्थी घराच्या बंद खोलीत निशब्द पडून राहिले.

अशात शिक्षण विभागाने ऑनलाइन शिक्षण यंत्रणा कार्यान्वित केली परंतु ही खरंच शिक्षण पद्धती योग्य आहे का? सुरळीत आहे का? हे सुद्धा पाहणे गरजेचे आहे. हा देश ग्रामीण भागाने जोडलेला आहे, शहराने नाही. देशाची अर्थव्यवस्था व शिक्षण व्यवस्था ग्रामीण भागाच्या नाळेशी जुळलेली आहे. आज शिक्षण विभागातील टॉपर पाहिले तर ग्रामीण भागातील जास्त आहेत. परंतु नवीन शिक्षण पद्धती अशी आली ऑनलाइन वस्तुस्थिती. गावात नाही नेट आणि शिक्षक म्हणतात ऑनलाईन भेट

ऑनलाईन शिक्षण पद्धतीचा विचार केला तर ग्रामीण भागात खाजगी संस्थांना पेव फुटला आहे. शिक्षणाचे बाजारीकरण झाले आहे. यामध्ये जेमतेम जिल्हा परिषद शाळा चौथी पर्यंत टिकून आहेत व जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकलेलं पोरगं भविष्यात उज्ज्वल नाव कमावताना दिसून येते. परंतु याच शाळा ऑनलाइन पद्धतीमुळे कायमचा बंद होण्याच्या मार्गावर आल्या आहेत. गावामध्ये साध्या मोबाईल ला लवकर रेंज येत नाही अशात ऑनलाईन अभ्यास करायचा कसा? यामध्ये दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ग्रामीण भागात ९०% शेतकरीवर्ग आहे.

या शेतक-यांच्या लेकरांना व त्यांच्या पालकांना अँड्रॉइड मोबाईल काय असतो. स्क्रीन चा मोबाईल कसला असतो हेच माहिती नाही. साधा हजार-बाराशे चा मोबाईल घेऊन लेकी बाळासाठी बोलण्यासाठी मोबाईल घेतला असतो. त्या मोबाईल मध्ये बॅलन्स भरण्यासाठी पैशाची मारामार आणि नेट चा मोबाईल घेऊन महिना तीनशे कोठून भरायचा तसेच स्क्रीनचा मोबाईल घेण्यासाठी कमीत कमी दहा ते पंधरा हजार कोठून आणायचे? हा मोठा प्रश्न आहे. क्वचित काही पालकांनी मोबाईल घेतला परंतु हे लहान लेकरं अभ्यासाच्या नावावर मोबाईल मधील गेम तसेच युट्युब वर इतर मनोरंजन करू लागले.

मोबाईलची स्क्रीन बारीक असल्याने डोळ्यावर परिणाम होऊ लागले. कारण ग्रामीण भागात मोबाईल घेऊ शकत नाहीत लॅपटॉप तर दूरच त्यामुळे स्क्रीन बारीक असल्याने डोळ्याचे आजार वाढले. अशा अनेक समस्या ग्रामीण भागात पहावयास मिळतात बहुतांश ८०टक्के मोबाईल लाच रेंज नाही मंग ऑनलाइन अभ्यास कसा करायचा हा मोठा प्रश्न आहे. सीनियर विद्यार्थीदेखील रेंज मुळे ग्रामीण भागात अडचणीत आहेत. लहान वयात मोबाईल हातात आल्याने याचे मोठे दुष्परिणाम लागलीच जाणवू लागले आहेत. त्यामुळे किमान ग्रामीण भागात शिक्षण प्रणाली याचे नियोजन करून बदलली पाहिजे.

असा पालकांतून सूर निघत आहे. एक तर ग्रामीण भागात विद्यार्थी संख्या जिल्हा परिषदेची पूर्ण घटली आहे. १५ ते २० विद्यार्थी यांच्यावर वर्गात विद्यार्थी नाहीत. त्यामुळे वेळ व विद्यार्थी संख्या याचे नियोजन करून प्रत्यक्ष घरी या विद्याथ्र्यांना होमवर्क गृहपाठ व शिक्षणाचे धडे देण्यात यावेत. एका शिक्षकाला कमीत कमी सध्या सुद्धा दहाच विद्यार्थी आहे याचे योग्य नियोजन केले तर नक्कीच क्लासेस सारखे शाळेचे वर्ग सुरू होऊ शकतात. शहरी भागात अत्याधुनिक सुविधा आहेत परंतु ग्रामीण भागात स्क्रीन लॅपटॉप अशा सुविधा नाहीत. त्यामुळे प्रायोगिक तत्त्वावर ग्रामीण भागात क्लासेस सारखे विद्याथ्र्यांना शिक्षणाचे ज्ञान देण्यासाठी तात्काळ प्रयत्न करावे.

कारण या लहान वयात शिक्षणापासून हे विद्यार्थी इतर ठिकाणी भरकटले तर पुन्हा या प्रवाहात आणणे मुश्कील होईल. साडेपाच महिने झाले ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षणापासून दूर होत चालले आहेत. कारण शेतकरी भोळाभाबडा शेतात कष्ट करून आधीच परेशान आहे. त्यात त्याची लेकरं शेतातील बांधा कोंदा नि पाठीमागे फिरताहेत. किमान दोन तास तीन तास समोर येऊन लेकराला शिकवा व घरी करण्यासाठी अभ्यास द्या. मोबाईलवर काहीच कळत नाही आमच्याकडे मोबाईल नाही असे पालक आता बोलू लागले आहेत. परिस्थिती अशी निर्माण झाली याठिकाणी खायचे वांदे झाले. अशावेळी स्क्रीन टच मोबाईल व त्याचे बॅलेन्स कोठून भरायचे असा सवाल भोळाभाबडा शेतकरी करत आहे.

कोरोना बाधित वृध्द महिलेच्या प्रेताला तहसीलदारांनी दिला ‘ मुखाग्नी ‘

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,413FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या