24 C
Latur
Monday, June 21, 2021
Homeउस्मानाबादहजारो करदात्यांकडून पीएम किसान योजनेत कोट्यावधीची लूट

हजारो करदात्यांकडून पीएम किसान योजनेत कोट्यावधीची लूट

एकमत ऑनलाईन

उस्मानाबाद (मच्छिंद्र कदम ) : जिल्ह्यात पीएम किसान योजनेचा पात्र नसतानाही हजारो करदात्या शेतकèयांनी कोट्यावधीची लूट केली आहे. या लुटारुमध्ये जिल्ह्यातील नामवंत धनदांडगे डॉक्टर, प्राध्यापक, शिक्षक आदी शासकीय अधिकारी, कर्मचाèयांचा समावेश आहे. या कर भरणा-यांना घेतलेली रक्कम परत करण्याच्या नोटीसा महसूल विभागाकडून जारी केल्या आहेत. नोटीसा जारी होताच या लुटारुंमध्ये एकच खळबळ उडाली आहे. सध्या त्यांच्याकडून कारवाईच्या भितीपोटी शासनाच्या खात्यात पैसे भरण्यासाठी धावपळ सुरु झाली आहे. या प्रकारावरुन शासनाच्या योजनेचा धनदांडगेच किती लाभ घेतात हे स्पष्ट होते.

पीएम किसान योजनेचा राज्यात सर्वत्र कर भरणाèयांनी लाभ घेतला आहे. यात एकट्या उस्मानाबादसारख्या जिल्ह्यात कोट्यवधीची लूट झाल्याचे दिसून येते. राज्यातील हा आकडा मोठा आहे. शासनाकडून याबाबत कारवाईचा बडगा उगारल्यानंतर या धनदांडग्यांना पैसे शासनाकडे जमा करण्यासाठी जाग आली आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात तलाठ्याकडून संबधित तलाठी सज्जाकडे याद्या गेल्या आहेत. त्यामुळे काही सज्जाअंतर्गत पीएम किसान योजनेचा लाभ घेतलेल्यांची यादी फेसबुक, व्हाट्सअपवर वायरल झाल्या आहेत. यामध्ये त्या-त्या गावातील धनदांडगे कर भरणा-या व्यक्तींचा समावेश आहे. तसेच शासकीय सेवेत असलेले प्राध्यापक, शिक्षक, डॉक्टर, शासकीय अधिकारी, कर्मचारी असल्याचे दिसून येत आहे.

त्यामुळे पीएम किसान योजनेत अपात्र व्यक्तींनी मोठ्या प्रमाणात लाभ घेतला आहे. त्यामुळे एका सज्जाअंतर्गत किमान ८ ते १० लाख रुपये शासनाची या योजनेत फसवणूक झाली आहे. उस्मानाबाद तालुक्यातील तेर सज्जातील ६२ जणांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. त्यात विविध करदाते असून डॉक्टर, प्राध्यापक, शिक्षक यासारख्यांचा समावेश आहे. केवळ तेर सज्जाअंतर्गत ६२ अपात्र व्यक्तींनी याचा लाभ घेवून ५ लाख ८८ हजार रुपयाची शासनाची फसवणूक केली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील जवळपास १५० ते २०० तलाठी सज्ज आहेत.यात हजारो अपात्र व्यक्तींकडून या योजनेचा लाभ घेतला आहे. त्यामुळे एकट्या उस्मानाबाद जिल्ह्यात पीएम किसान योजनेत शासनाची कोट्यावधी रुपयाची फसवणूक झाली आहे.पीएम किसान सन्मान योजनेत लाभ घेतलेल्या अपात्र शेतकèयांना लाभाची रक्कम परत करण्याची सूचना केली आहे. याबाबत तलाठी यांच्या मार्फत नोटीसा देण्यात आल्या आहेत.

महसूल विभागाने गावोगावी विशेष चावडी वाचन मोहिम राबविण्यात येत आहे. यात प्रामुख्याने आता जमीन नसलेले जे की पूर्वी जमीनधारक म्हणून पात्र होते. पती-पत्नी दोघेही लाभ घेत असलेल्यापैकी एकच, वर्ग चारचे सेवानिवृत्त शेतीधारक ज्यांचे पेन्शन दहा हजारापेक्षा पुढे आहे असे लाभार्थी अपात्र ठरविण्यात येत आहेत. तसेच इनकम टॅक्स भरणाèया शेतकèयांनी या योजनेचा लाभ घेतला असल्याचे शासनाच्या निदर्शनास आल्याने त्यांच्याकडून वसुली करण्याबाबत तलाठ्यामार्फत नोटीस बजावण्यात आल्या आहेत. नोटीसा बजावल्यानंतर अपात्र शेतकèयांची कारवाईपोटी रक्कम शासनाकडे जमा करण्यासाठी धावपळ सुरु झाली आहे.

योजनेतील अपात्र शेतक-यांकडून वसूलीची कारवाई सुरु – तहसिलदार माळी
जे शेतकरी आयकर भरतात. अशांच्या याद्या आयकर विभागाकडून महसूल विभागास प्राप्त झाल्या आहेत. या याद्या तालुक्यातील सर्व तलाठ्याकडे पाठविण्यात आल्या आहेत. संबंधित शेतकèयांना नोटीसा देण्यात आल्या आहेत. पीएम किसान योजनेअंतर्गत अपात्र असतानाही या योजनेचा लाभ घेतल्याबद्दल त्यांच्याकडून वसूलीची कारवाई सुरु आहे. यात अनेकजण रक्कम भरण्यास तयार आहेत. यात वसूलीची रक्कम व जमा झालेली रक्कम याबाबत आकडेवारीची माहिती घेवून सांगतो,असे उस्मानाबादचे तहसिलदार गणेश माळी यांनी सांगितले.

एक भन्नाट क्रांतिकारी तंत्रज्ञान

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
203FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या