25.4 C
Latur
Wednesday, May 19, 2021
Homeउस्मानाबादलाचखोर दुय्यम निबंधक कार्यालयातील तिघे जेरबंद

लाचखोर दुय्यम निबंधक कार्यालयातील तिघे जेरबंद

एकमत ऑनलाईन

कळंब : सध्या कोरोना महामारीमुळे सर्वत्र नागरिक त्रस्त आहेत. मात्र प्रशासनातील मस्तवाल लाचखोर अधिकारी लाच घेण्यात व्यस्त आहेत. हे कळंब येथील दुय्यम निबंधक कार्यालयातील प्रकरणावरुन स्पष्ट होते. जमिनीचा दस्ताऐवज देण्यासाठी दहा हजार लाचेची मागणी करुन स्विकारताना तिघांना एसीबीच्या पथकाने शुक्रवारी (दि.१६) रंगेहाथ धरले आहे.

याबाबत माहिती अशी की, कळंब तालुक्यातील मोहा येथील जमिनीचे दस्ताऐवज करण्यासाठी दहा हजार रुपये लाच रक्कम स्विकारल्याने प्रभारी दुय्यम निबंधाका अम्रत बंडगर यांच्यासह दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग उस्मानाबाद यांनी ताब्यात घेतल्याने खळबळ उडाली आहे. ज्यांनी तक्रार केली ते दुय्यम निबंधक कार्यालयाच्या परिसरात खरेदी विक्रीचे दस्त तयार करण्याचे काम करीत असून तक्रारदार यांनी मोहा येथील पक्षकाराचे जमीन खरेदीखत दस्त बनवून प्रभारी दुय्यम निबंधक अमृता पांडुरंग बंडगर यांचेकडे सादर केले होते.

यावेळी त्यांनी पक्षकार लिहून देणार हे वयोवृद्ध असून सध्या कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव असल्याचे कारण सांगून सदर कामासाठी पक्षकाराकडून १० हजार रुपये घेऊन देण्यासाठी पंचांसमक्ष सांगून दहा हजर रुपये लाचेची मागणी ८ एप्रिल रोजी केली होती. व ही लाच शुक्रवारी (दि.१६) पंचांसमक्ष स्वीकारून त्यांचा खाजगी चालक विठ्ठल गोरोबा गहूदळे (रा. तांबरी विभाग उस्मानाबाद) यांचेकडे दिली. या कामात गणेश गोपीनाथ फावडे (रा. सावरगाव, ता. कळंब) यांनी प्रोत्साहन दिले आहे. याबाबत कळंब पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया चालू आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक राहुल खाडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. अनिता जमादार, पोलीस उप अधीक्षक प्रशांत संपते यांचे मार्गदर्शनाखाली पोनि. गौरीशंकर पाबळे यांनी केली. याकामी त्यांना पोलीस अंमलदार इफतेकार शेख, विष्णू बेळे, विशाल डोके, चालक दत्तात्रय करडे यांनी मदत केली.

जळकोट येथे जमावबंदीतही नागरिक बेगुमान

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,498FansLike
190FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या