नळदुर्ग : जिल्ह्याच्या काही भागात मंगळवारी व बुुधवारी सलग दोन दिवस वादळी पाऊस झाला. नळदुर्ग ता. तुळजापूर येथे व परिसरात बुधवारी दि. 1 जून रोजी दुपारी मेघगर्जनेसह गारांचा पाऊस झाला आहे. पावसाचे आगमन झाल्याने शेतकर्यांनी पेरणीपुर्व मशागतीच्या कामांना वेग दिला आहे.
मंगळवारी सायंकाळी उस्मानाबाद तालुक्यातील समुद्रवाणी, पाडोळी (आ), चिखली, राजूरी, सारोळा बु, टाकळी (ढोकी), या गावासह तालुक्यातील अनेक गावात दमदार पाऊस झाला आहे. नळदुर्ग ता. तुळजापूर येथे व परिसरात बुधवारी दुपारी मेघगर्जनेसह गारांचा पाऊस झाला आहे. या पावसामुळे आंबा फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणची मोठमोठी झाडे उन्मळून पडली आहेत. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर पाऊस होत असल्याने शेतकर्यांनी पेरणीपुर्व मशागतींची कामे करण्याला वेग दिला आहे.