34.4 C
Latur
Friday, March 5, 2021
Home उस्मानाबाद कोरोना काळात कलाकारांची कलेला तिलांजली

कोरोना काळात कलाकारांची कलेला तिलांजली

एकमत ऑनलाईन

सतिश टोणगे : कोरोना महामारीच्या दुष्ट दशावताराने भल्याभल्यांची वाईट दशा केली असून मोठ मोठ्या कंपन्या व व्यापा-यांपासून छोट्यामोठ्या कलाकारांच्या पोटावर पाय देण्याचे काम महामारीने केले. यामध्ये अनेक कलाकारांचे संसार उघड्यावर पडले तर काही कलाकारांनी दुसरा व्यवसाय सुरु केला. तर काहीनी शेतमजूरीची वाट धरली. त्यातही कोरोना महामारीच्या भितीने कामही मिळेना,रोजगार भेटेना पोट बसु देईना.

करे तो क्या करे !
मोहा येथे गेली अनेक वर्षांपासून विजय ब्रासबँड पथक हे सर्वदूर सर्वपरिचित आपल्या कलाकारीमुळे प्रसिद्ध आहे. तर सद्यस्थितीत होते. आपल्या कलाकारीच्या जोरावर जवळजवळ ५० वर्षापासुन आजपर्यंत निर्वीवादपणे लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवणा-या ब्रासबँड पथक चालकावर व त्यातील कलाकारावर उपासमारीची वेळ आली आहे. उपजिवीकेचे साधन म्हणून ब्रासबँडच्या माध्यमातून अनेक कलाकाराच्या रोजीरोटीचा प्रश्न मार्गी लागला होता.कलाकाराच्या कलाकारीवर पंचक्रोशीतीलच नव्हे तर अख्खा महाराष्ट्रातील जनता खूश होती.

पथकाच्या माध्यमातून वार्षिक उत्पन्न ब-यापैकी होत होती. लग्न समारंभ, वाढदिवस, जयंती निमित्त किंवा इतर इव्हेंट्स साठी भारी भक्कम कमाई करणार्या व पथकातील अनेक छोट्या मोठ्या कलाकारांचे संसार उभे होते. आपल्या कलाकारीने उभ्या महाराष्ट्राला भुरळ पाडणा-या पथक चालकावर कोरोनामुळे उपासमारीची वेळ आली आहे. आतापर्यंत कष्टाने कमावलेले मागील ८ महिन्यापासून हैदोस घालणाèया कोरोना महामारीने गमावले आहे. त्यामुळे आपला उदरनिर्वाह भागवण्यासाठी बँडपथकाचे प्रमुख श्री कमलाकर कसबे यानी चक्क चहा व वडापावचा स्टाँल लावला आहे.

ना शेती, ना मजूरी, ना पथक, ना शासनाची मदत. भुक तर लागणारच. भुक भागवण्यासाठी व प्रपंच चालवण्यासाठी मार्ग तर शोधावाच लागणार म्हणून पथक प्रमुख कमलाकर कसबे यांनी पत्र्याचे शेड मारुन वडापाव स्टाँल चालू केला. मायबाप शासनाने कोरोना काळात आशा कलाकाराना थोडीफार तरी मदत करुन कलाकारा बरोबरच त्यांची कला जोपासावी असे कसबे यानी सांगितले.

मोठ्या कष्टाने वडीलांनी उभा केलेला हा व्यवसाय तेवढ्याच नेटाने व जोमात चालू ठेवण्याचा आम्ही तिन भावानी अगदी प्रामाणिकपणे प्रयत्न केला. आधुनिक तंत्रज्ञानाबरोबर पथकाची प्रगती केली.सर्व कलाकारांचा आर्थिक गाडा सुरळीत चालू होता. पण या कोरोना महामारीने आम्हा कलाकारांच्या तोंडचा घास हिसकावला. व पथकातील कलाकारावर चक्क उपासमारीची वेळ आली. कलाकाराना शासनाने कोरोना काळात काही न काही तरी मदत करावी यासाठी अनेक प्रयत्न केले पण आमची दखल घेतली गेली नाही. याबाबत मुख्यमंत्री, सचिवापर्यंत पत्र व्यवहार केला परंतु सद्यस्थितीत त्याचा काही उपयोग झाला नसल्याचे दिसून येत आहे. वडीलानी लावलेल्या रोपट्याचा वटवृक्ष झाला.

आम्ही आमच्या प्रयत्नाने उभ्या महाराष्ट्रात विजय ब्राँस बँडच्या माध्यमातून लोकांना आमची कलाकारी दाखवत गेलो. जनता जनार्दनानी आम्हाला खूप मोठी साथ दिली. सर्व काही सुरळीत सुरू असताना कोरोना महामारीने आम्हाला आर्थिक दृष्ट्या साफ केले. नाविलाजाने पोटाची खळगी भरण्यासाठी येत नसताना हा चहा वडापावचा धंदा सुरु केला आहे. सध्या नवरात्र चालू आहे, देवीने आमचे वर आलेल्या संकटाला सामोरे जाण्यासाठी बळ द्यावे एवढेच साकडे हे कलाकार घालत आहेत.

आत्महत्या नको; फक्त एक फोन करा

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,440FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या