26.6 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeउस्मानाबादभूमी अभिलेखच्या मोजणी पथकाला मारहाण करून मोजणी यंत्राची तोडफोड

भूमी अभिलेखच्या मोजणी पथकाला मारहाण करून मोजणी यंत्राची तोडफोड

एकमत ऑनलाईन

उस्मानाबाद : शेतीची मोजणी करण्यासाठी गेलेल्या भूमी अभिलेख कार्यालयाच्या मोजणी पथकाला दोघांनी मारहाण करून मोजणी यंत्राची तोडफोड केली. ही घटना ५ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता तुळजापूर तालुक्यातील रामतीर्थ शिवारात घडली. या प्रकरणी भूमी अभिलेख कार्यालयाचे उपअधीक्षक सिद्धार्थ सोनकांबळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नळदुर्ग येथील दोघांच्या विरोधात शासकीय कामात अडथळा आणल्यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तुळजापूर भुमी अभिलेख कार्यालयाचे पथक तुळजापूर तालुक्यातील रामतिर्थ येथील गट क्र. ८५ मध्ये शासकीय मोजणी करण्यासाठी गेले होते. यावेळी रियासत शेख, बरकतुल्ला जहागिरदार (रा. नळदुर्ग) दोन आरोपींनी पथकाने मोजणी करु नये म्हणुन त्यांच्या अंगावर धावून जावून शिवीगाळ करू लागले. त्या दोघांनी भूमी अभिलेख कार्यालयाचे उपअधीक्षक सिद्धार्थ सोनकांबळे यांची गचांडी धरुन लोखंडी गजाने त्यांच्या उजव्या मांडीवर मारुन मुका मार दिला. तसेच पथकाच्या ईटीएस मोजणी यंत्राची तोडफोड करुन पथकाच्या शासकीय कामात जाणीवपुर्वक अडथळा केला. या प्रकरणी सिध्दार्थ सोनकांबळे यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन दोघांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे.

 

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या