उस्मानाबाद : तालुक्यातील बेंबळी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात एका विवाहित महिलेवर नवर्यासोबत घटस्फोट घे, मी तुझ्याशी लग्न करतो, असे म्हणबन तीच्यावर लैंगिक अत्याचार केला. घडलेला प्रकार कोणाला सांगितल्यास तीला व पतीला ठार मारण्याची धमकी दिली. ही घटना १९ जून रोजी घडली आहे. या प्रकरणी बेंबळी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक २६ वर्षीय विवाहित महिला (नाव- गाव गोपनीय) आपले राहते घरी एकटीच असताना गावातील एका तरुणाने तिच्या घरात येवून, तु तुझे नवर्यास घटस्फोट दे, मी तुझ्याशी लग्न करतो. असे असे म्हणून तीच्यावर लैंगिक अत्याचार केला.
घडल्या प्रकाराची वाच्यता केल्यास तीला व तीच्या पतीला ठार मारण्याची धमकी तीला दिली. या प्रकरणी पिडीत महिलेने दिलेल्या प्रथम खबरेवरुन बेंबळी पोलीस ठाण्यात २१ जून रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.