सावरगाव : तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथील टोलनाक्याजवळ ट्रक चालकाने रविवारी गळफास घेऊन आत्महत्या केली. बाबू श्रीरंग निंगुळे (वय ३८, रा. सुरडी ता. केज, जि. बीड) असे मयत ट्रक चालकाचे नाव आहे.
घटनेची माहिती मिळतातच तामलवाडी ठाण्याचे सपोनि सचिन पंडित, सहाय्यक पोलिस उपनिरिक्षक रमेश घुले, पोलिस नाईक काझी, पोलिस अंमलदार आबा तोगे यांनी भेट देऊन पंचनामा केला. सावरगाव आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.