तुळजापूर : राज्यातील हॉटेल, बार, लोकल, लांब पल्ल्याचा रेल्वे सर्व काही सुरू करण्यात आले असताना हजारो लोकांचा उदर निर्वाह अवलंबून असलेली धार्मिक स्थळे बंद का असा सवाल करून काय अटी घालायच्या त्या घालाव्यात पण राज्य सरकारने धार्मिक स्थळे सुरू करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी भाजपचे आ. रानाजगजितसिंह पाटील यांनी केली.
शहरातील नवीन शासकीय विश्राम गृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत आ. पाटील बोलत होते. यावेळी नगराध्यक्ष सचिन रोचकरी, नगरसेवक चंद्रकांत कणे, माजी नगरसेवक नारायण नन्नवरे आदींची उपस्थिती होती.
केंद्र सरकारने जुलै मध्येच धार्मिक स्थळे खुली करण्याची परवानगी दिली आहे. देशातील सर्व प्रमुख धार्मिक स्थळे खुली करण्यात आली आहेत. राज्यात सुध्दा सर्व काही सुरू करण्यात आले आहे मग राज्यातील धार्मिक स्थळेच बंद का असा सवाल आ. पाटील यांनी विचारला. मास्क बांधणे, सोशल डिस्टन्सीग, सॅनीटायझर, भाविकांची संख्या आदी काय अटी घालायच्या त्या घालाव्यात मात्र राज्यातील धार्मिक स्थळे तातडीने खुली करावीत अशी मागणी आ. पाटील यांनी यांनी केली आहे.
राज्यातील धार्मिक स्थळे खुली करण्याची मागणी करणारे पत्र नगराध्यक्ष सचिन रोचकरी मुख्यमंत्र्यांना लिहिणार असून मुख्यमंत्र्यांनी मागणी मान्य न केल्यास राज्याचा राज्यपालाकडे दाद मागणार. राज्यपालांकडे ही न्याय न मिळाल्यास उच्च न्यायालयात धाव घेणार असल्याचे आ. पाटील यांनी यावेळी जाहीर केले. मंदिर उघडण्याचा मागणी साठी आ. पाटील यांनी यापूर्वीच तुळजाभवानी मंदिरासमोर आंदोलन केले होते.
यावेळी तालुका खरेदी-विक्री संघाचे चेअरमन शिवाजी बोधले, व्हा. चेअरमन बाळासाहेब भोसले, बाळासाहेब शामराज, नगराध्यक्ष सचिन रोचकरी, विनोद गंगणे, बापू कणे, नारायण नन्नवरे, नागेश नाईक, राजसिंह निंबाळकर , रत्नदिप भोसले, सचिन जाधव उपस्थित होते. राज्यातील धार्मिक स्थळे खुली करावीत व इतर विकास कामाची व कोरोनाविषयी चर्चा झाली.
श्री. तुळजाभवानी मंदिर नवरात्र महोत्सवातही भक्तांसाठी बंदच राहणार