20.9 C
Latur
Tuesday, September 28, 2021
Homeउस्मानाबादतुळजापूर गांजा तस्करीचा पर्दाफाश;३४ लाखाचा मुद्देमाल जप्त

तुळजापूर गांजा तस्करीचा पर्दाफाश;३४ लाखाचा मुद्देमाल जप्त

एकमत ऑनलाईन

तुळजापूर : तुळजापूर शहरातून छोटा हत्तीमधून गांजाची वाहतूक केली जात असल्याची माहिती तुळजापूर पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी गाडीचा पाठलाग करीत येरमाळा येथे गाडी ताब्यात घेऊन तुळजापूर पोलिस ठाण्यात आणण्यात आली. यावेळी वाहनातून तब्बल ३१ लाख ३४ हजार रुपयांचा गांजा व वाहन असे ३४ लाख ३४,२०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. यावेळी दोन आरोपी ताब्यात घेतली आहे. ही कारवाई बुधवारी (दि.१४) रात्री १२ वाजण्याच्या सुमारास पेट्रोलींग करीत असताना केली. तुळजापूर पोलीस ठाण्यात गुरुवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात एका महिलांचाही समावेश आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, हैद्राबाद येथील ट्रकमधून तुळजापूर येथे गांजा आणून तुळजापूर बस स्थानक येथे आरोपीनी तुळजापूर येथील छोटा हत्ती एम.एच २५ ए.जे ३२०१ हा भाड्याने करून जालन्याकडे जात असल्याची माहिती तुळजापूर पोलिसांना मिळताच पोलिसांनी पाठलाग करून येरमाळा येथे छोटा हत्ती चालक गोपी लहु कांबळे व महिला ममता भाऊसाहेब जाधव यांना ताब्यात घेऊन त्यांच्या ताब्यातील ७ गाठोडे व एक बॅग मधील गांजा ताब्यात घेतला आहे. यामध्ये १५६ किलो ७१ ग्रॉम गांजा २० हजार रुपये किमतीचे ३१ लाख ३४ हजार रुपयांचा जप्त केला आहे व गुन्ह्यात वापरलेल्या वाहान किंमत ३ लाख असे गांजा व वाहन मिळून एकूण ३४ लाख ३४ हजार २०० मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

ही पोलीस निरीक्षक अजिनाथ काशीद, पोलीस कॉन्स्टेबल महेश सावरे, बी.एस. मंडोळे, सहाय्यक फौजदार रवि शिंदे यांनी केली असून याप्रकरणी पोलीस शहर बीट अमलदार विजयकुमार राठोड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तुळजापूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला असून गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक अजिनाथ काशीद हे करत आहेत. तुळजापूर पोलिसांनी सर्वात मोठी कारवाही केली. त्यामुळे अवैध धंदेवाल्यांची धाबे दणाणले आहेत. पुन्हा एकदा पोलिसांनी धडककारवाई करत मुद्देमाल व आरोपी ताब्यात घेतले आहेत.

बुधवारी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास पेट्रोलींग करीत असताना कर्मचा-याकडून माहिती मिळताच छोटा हत्ती वाहनातून तब्बल ३१ लाख ३४ हजार रुपयांचा गांजा तुळजापूर शहरातून जात होता. त्याला आम्ही येरमाळा येथे वाहनासहीत मुद्देमाल हस्तगत केला.
-पीआय आदिनाथ काशीद, तुळजापूर

जम्मूत वेगवेगळ्या ठिकाणी दिसले ४ ड्रोन

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
194FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या