26.1 C
Latur
Friday, July 1, 2022
Homeउस्मानाबादजीपच्या धडकेत दुचाकीवरील दोघे जागीच ठार

जीपच्या धडकेत दुचाकीवरील दोघे जागीच ठार

एकमत ऑनलाईन

उस्मानाबाद : जीपने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीवरील दोघेजण ठार झाले. हा अपघात उमरगा येथील पर्यायी रस्त्यावर घडला.

सुधाकर बिराजदार यांनी 18 मे रोजी उमरगा येथील पर्यायी रस्त्याने क्लुजर वाहन (क्र. एम.एच. 25 आर 3282) हे निष्काळजीपने चालवल्याने सुग्राव मोतीराम नागनबोणे (वय 55, रा. वाघदरी, ता. उमरगा) हे चालवत असलेल्या मोटारसायकलला पाठीमागुन धडकले. या अपघातात सुग्रीव नागनबोणे यांसह त्यांच्या पाठीमागे बसलेल्या सुकशाबाई एकनाथ बोरुळे, वय 50 वर्षे या गंभीर जखमी होऊन मयत झाल्या.

याप्रकरणी नेताजी सुग्रीव नागनबोणे (रा. वाघदरी) यांनी 30 मे रोजी उमरगा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यावरून भादंसं कलम 279, 337, 338, 304 (अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या