33.7 C
Latur
Monday, March 1, 2021
Home उस्मानाबाद उजनीचे पाणी सिनाकोळेगावमध्ये लवकरच पोहोचणार; आ. तानाजी सावंत यांचा पाठपुरावा

उजनीचे पाणी सिनाकोळेगावमध्ये लवकरच पोहोचणार; आ. तानाजी सावंत यांचा पाठपुरावा

एकमत ऑनलाईन

परंडा : आमदार प्रा. तानाजी सावंत यांनी मतदार संघातील जनतेला निवडणुकीत दिलेले आश्वासन पुर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन मराठवाड्याच्या हक्काचे उजनी प्रकल्पातील पाणी सिनाकोळेगाव प्रकल्पामध्ये आणण्यासाठी सुरू असलेल्या कामास गती देण्याची मागणी केली. त्या अनुशंगाने मुख्यमंत्र्यांनी संबंधीत योजनेच्या आधिका-यांसोबत या कामी तातडीने बैठक घेऊन कामास प्राधान्य देऊन काम पुर्ण करण्याच्या सुचना केल्या असल्याने लवकरात लवकर उजनीचे पाणी सिनाकोळगाव प्रकल्पात पोहचणार आसल्याचे आ. सावंत यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगीतले.

जि.प. सभापती दत्ता साळुंके यांनी आज दि. ८ डीसें. रोजी पत्रकार परीषद घेऊन आ.प्रा. सावंत यांचे प्रसिद्धीपत्रक देऊन ही माहीती दिली, यावेळी आमदार प्रा. तानाजी सावंत प्रातिष्ठानचे अध्यक्ष रामचंद्र घोगरे, श्याम मोरे उपस्थीत होते. दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, उजनी प्रकल्पाचे पाणी मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारे असल्याने नियोजित प्रकल्प लवकरच पूर्ण करण्यास संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिका-यांची वारंवार चर्चा, पत्रव्यवहार व पाठपुरावा चालू आहे. शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची दि. १६ नोव्हेंबर २०२० रोजी मी प्रत्यक्ष भेट घेऊन उजनीच्या पाण्याचे सदर भागाकरिता नितांत गरज असल्याचे निदर्शनास आणून देत हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी तातडीची बैठक बोलवण्याची विनंती केली होती. माझ्या विनंतीची दखल घेत त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या अध्यक्षतेखाली दि.२६ नोव्हेंबर २० रोजी मुंबई येथे वर्षा या निवासस्थानी आढावा बैठकीचे आयोजन केले होते.

यामध्ये कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प उस्मानाबाद या प्रकल्पास सन २०१७ मध्ये प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती सदर प्रकल्पास बीड जिल्ह्याच्या समावेशासह सन २००९ मध्ये प्रथम सुधारित प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे त्यानुसार प्रकल्पाचे नियोजन करून कामे सन २००९- १० पासून सुरू करण्यात आली होती. या प्रकल्पांच्या पूर्णत्वासाठी आणि मी निवडणुकीच्या वेळी मतदारसंघातील शेतकरी बांधवांना दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा करतो प्रकल्पास पर्यावरण विभागाची मान्यता नसल्याने प्रकल्पाची कामे बंद ठेवण्यात आली होती सन २०१५ मध्ये पर्यावरण विभागाची मान्यता प्राप्त झाल्यानंतर प्रकल्पाची कामे सुरु करण्यात आली नीरा व सीना या दोन्ही नद्या भीमा नदीच्या उपनद्या असल्याने नीरा नदीत उपलब्ध ७.०० दघफु पाणी प्रकल्पास सन २०१७ मध्ये उपलब्ध करून देण्यात आले.

लग्नानंतर मुलीनेच धर्म का बदलायचा?

सन २०१८ मध्ये शासनामार्फत प्रकल्पाचे फेर नियोजन व प्राधान्यक्रम ठरवण्यात आला सदर शासनाच्या सूचनेनुसार प्रथम प्राधान्याने उध्र्व बॅरेज निरा भिमा जोड बोगदा जेऊर बोगदा व मिरगव्हाण पंपगृह आदी कामे हाती घेण्याबाबत शासनाने सूचित केले आहे सिना कोळेगाव प्रकल्प सन २०१० पासून २०२० पर्यंत प्रकल्प फक्त चार वेळा १०० % क्षमतेने भरला आहे उजनी प्रकल्पाचा विचार केला तर सन २०२० पर्यंत प्रकल्पातून ९० उघफु पाणी प्रकल्पाचा खालच्या बाजूस नदी द्वारे वाहून गेले आहे निरा वसिना या दोन्ही नद्या भीमा नदीच्या उपनद्या असल्याने एकाच उपखोर्यात येत आहेत लवादाच्या निर्णयाच्या अधीन राहून उजनी जलाशयातून अतिरिक्त वाहून गेलेले पाणी सीना-कोळेगाव प्रकल्पातून वळविण्यास प्रकल्पाच्या पुढील टप्प्यात सुमारे सहा हजार हेक्टर qसचनाचा लाभ निर्माण होऊ शकतो प्रकल्पाच्या पुढील टप्प्यातील कामे सुरू करण्याचे नियोजन असून मुख्यमंत्र्यांनी परंडा भूम वाशी मतदार संघातील साकत मध्यम प्रकल्प पर्यंत ची कामे हाती घेऊन पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत सीना-कोळेगाव प्रकल्पाच्या पुढील टप्प्यातील कामे दीड वर्षात पूर्ण करण्याच्या तात्काळ मंजु-या व सूचना दिल्या आहेत त्या सर्व कामाचा पाठपुरावा मी जातीने करतो आहे.

पद असो वा नसो जनतेला दिलेला शब्द पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सहमतीने पूर्णत्वास नेत आहे बैठक यशस्वीरित्या पार पडली असून प्रकल्पाचे कामे पूर्ण करण्यासाठी निधी तात्काळ उपलब्ध करुन देण्याचे मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले आहे कामाचा दररोज आढावा स्वतः घेत असून या बैठकीस मुख्यमंत्र्याचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, प्रधान सचिव विकास खरगे, प्रधान सचिव जलसंधारण लोकेश चंद्र, सचिव प्रकल्प समन्वयक एन. व्ही. शिंदे, उस्मानाबाद पाटबंधारे मंडळाचे अधिक्षक अभियंता भारत शिंगाडे, कार्यकारी अभियंता प्रवीण चावरे आदींची उपस्थिती होती. आ. तानाजीराव सावंत हे मागच्या सराकरमध्ये मंत्री होते. त्या काळातही त्यांनी मतदारसंघातील अनेक विषय मार्गी लावले आहेत. आता महत्वाचा विषय हाती घेतल्याने हा विषय मार्गी लागणार आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,438FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या