18.1 C
Latur
Friday, December 2, 2022
Homeउस्मानाबादउमरगा पोलिसांनी पकडला २३ लाखाचा गुटखा

उमरगा पोलिसांनी पकडला २३ लाखाचा गुटखा

एकमत ऑनलाईन

उमरगा : कर्नाटकातील कलबुर्गी येथून आलेल्या टेम्पोची उमरगा शहरात तपासणी केली असता त्यामध्ये २३ लाख १० हजार रूपयांचा बनावट गुटखा आढळून आला. उमरगा पोलिसांनी ३१ ऑक्टोबर रोजी ही कारवाई केली असून टेम्पो जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्नाटकातील कलबुर्गी येथून निघालेला एक आयशर टेम्पो क्र. (एमएच १३ एएक्स ३७१६) शहरातील हिंदुस्तान पेट्रोल पंपावर उभा होता. या टेम्पोतून बनावट गुटखा वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिस अधिक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलिस अधिक्षक नवनीत कॉवत, पोलीस उपअधीक्षक रमेश बरकते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक मनोजकुमार राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरिक्षक समाधान कवडे, पोलीस नाईक अतुल जाधव, पोलीस हेड कॉन्स्टेबल सलीम शेख, पोलीस कर्मचारी शुभम दिवे यांनी टेम्पोसह चालकास ताब्यात घेत गुटखा जप्त केला.

मंगळवारी (दि. १) दुपारी अन्न भेसळ व औषधी विभागाच्यासमोर आयशर टेम्पोची तपासणी केली असता त्यामध्ये पांर्ढ­या पोत्याच्या ३५ बॅग बनावट गुटखा आढळून आला. एकुण २३ लाख १० हजार रुपयांचा बनावट गुटखा, टेम्पोची किंमत पाच लाख रुपये असा एकूण २८ लाख १० हजार रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त करून ताब्यात घेतला आहे.

ट्रकचालक अजिम करीम शेख (रा . हमीदनगर, उमरगा) याला अटक करण्यात आली आहे. दरम्यान पोलिसांनी अन्न भेसळ औषधी विभागास माहिती दिली होती. अन्न-भेसळ औषधी अधिकारी श्रीमती न. त. मुजावर, नमुना सहाय्यक आकोसकर यांनी गुटख्याची मोजदाद केली. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक महेश क्षीरसागर करत आहेत.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या