वाशी : सोयाबीन काढण्यासाठी मजूर मिळत नसल्याने शेतकड्ढयांना अनेक त्रासांना सामोरे जावे लागत आहे. यामुळे काही शेतकरी जादा पैसे देवून तर काही शेतकरी आता आपल्या कुटुंबातील लोकांना बरोबर घेऊन सोयाबीन काढत आहेत.
यावर्षी सुरुवातीला पाऊस पडला आणि वाशी तालुक्यात ३७ हजार ३२६ हेक्टर सोयाबीनचे पेरणी करण्यात आली. यानंतर पावसाने ओढ दिली. एक महिन्याच्या विश्रांती नंतर पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसाने काही अपवादात्मक शेतकड्ढयांचे नुकसान वगळता सर्व शेतक-यांचे पीक जोमात आले. पिक जोमात आल्यामुळे शेतक-यांची आर्थिक गणिताची चक्र ही जमाने फिरू लागली. अशा स्थितीत गेल्या आठवड्या मध्ये अतिवृष्टी रुपी पावसाने हजेरी लावली आणि जे त्यानेच दिले होते ते त्यानेच हिरावून घेतले. सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले. सर्व पिकांमध्ये पाणीच पाणी साचले तर काही पिके पाण्यात बुडून गेली. वाशी तालुक्यात मांजरा नदीकाठी असणा-या फक्राबाद, पारा, डोंगरेवाडी व इतर गावातील शेती मधील सोयाबीनच्या पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. गेल्या तीन ते चार दिवसात अधूनमधून पाऊस येत असला तरी पावसाने बड्ढयापैकी उघडीप दिल्याने शेतक-यांची सोयाबीन काढणीसाठी लगबग दिसून येत आहे.
पावसाने परत पीकाचे नुकसान होऊ नये म्हणून सोयाबीन काढण्यासाठी शेतक-यांची धावपळ चाललेली सर्वत्र दिसून येत आहे. काही व्यवसायिक शेतकरी देखील आहेत. त्यामुळे ते देखील आपापली दुकाने बंद ठेवून सोयाबीन काढण्यात व्यस्त झाल्याचे पहावयास मिळत आहे. अशा परिस्थितीमध्ये पिक काढण्यासाठी सध्या मजुरांची कमतरता भासत आहे. यामध्येच पाण्यामधील, चिखला मधील सोयाबीन काढावयाची असल्यामुळे मजूर लोक जास्त पैशाची मागणी करत आहेत. शेतकड्ढयांना मजबुरी म्हणून जास्तीचे देखील पैसे देखील शेतक-यांना सध्या मोजावे लागत आहेत. काही जणांना जास्तीचे पैसे देऊन देखील मजूर मिळत नसल्याचे दिसत आहे. मजूर मिळत नसल्याने शेतक-यांना सध्या अनेक त्रासांना सामोरे जावे लागत आहे. मजूर मिळत नाही आणि पीक काढणे आवश्यक असल्यामुळे घरातील सदस्यांची जांगजोड लावून ०कवा एक दुस-याला पीक काढावयास लागून सोयाबीनचे पीक काढले जात आहे.