तुळजापूर : बहिणीला घरचे त्रास देतात म्हणून भाऊ बहिणीच्या घरच्यांना जाब विचारायला गेला. याचे रुपांतर भांडणात झाले. रागाच्या भरात मामाने भाच्यावर गावटी कट्टयातून गोळी झाडली. सुदैवाने भाचा जखमी झाला असून मामा फरार आहे. ही घटना तुळजापुर तालुक्यातील बारुळ येथे घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, आरोपी भाग्यवान लक्ष्मण गायकवाड रा. चिकुंद्रा यांची बहिण तुळजापुर तालुक्यातील बारुळ येथे दिली आहे. आरोपीच्या बहिणीला घरचे नेहमी त्रास देतात म्हणून भाग्यवान गायकवाड हा जाब विचारण्यासाठी गेला असता सुरुवातीला भांडण झाले. याचे रुपांतर हाणामारीत झाले. भाच्चा सार्थक मस्के वय १३ हा वडिलांची बाजु घेतोय म्हणुन रागाच्या भरात भाग्यवान गायकवाड याने भाचा सार्थकवर गोळी झाडली. वेळीच सार्थकने डावा हात वर केल्यामुळे कोप-याच्या खाली गोळी चाटुन गेली.
यात सार्थकच्या डाव्या कोप-याला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्यास तात्काळ सोलापूर येथील अश्विनी हाँस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. गोळी भाच्चाला लागतातच भाग्यवान गायकवाड हा तेथून पळुन गेला. या बाबत दिगंबर बळी मस्के यांनी तुळजापुर पोलीस स्टेशनला तक्रार दिली असून भाग्यवान लक्ष्मण गायकवाड विरोधात भादवी ३०७,५०४ सह कलम ४.२५ आर्म अँक्ट नुसार गुन्हा दाखल केला असून आरोपी भाग्यवान गायकवाड हा फरार आहे. या घटनेचा अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सई भोरे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अजिनाथ काशिद व सहाय्यक पोलिस निरीक्षक कांबळे करत आहेत.
तुळजापुर तालुक्यात गावटी पिस्टल
बारुळ येथील घटनेमध्ये आरोपीने गावठी पिस्टल वापरले असून गावठी पिस्टल आले कोठुन हा शोध पोलीसांना घ्यावा लागणार आहे. कारण गावठी पिस्टल बनवणारी टोळी तालुक्यात सक्रिय झाली आहे हे पाहणे गरजेचे आहे.