30.2 C
Latur
Wednesday, March 3, 2021
Home उस्मानाबाद ईट खून प्रकरणाचा उलगडा

ईट खून प्रकरणाचा उलगडा

एकमत ऑनलाईन

ईट : भूम तालुक्यातील ईट शिवारात दगडाने ठेचून एकाचा खून झाल्याची घटना शनिवारी (दि.२३) उघडकीस आली होती. या प्रकरणाचा छडा पोलिसांनी अवघ्या तीन तासात लावला असून शनिवारी रात्री उशीरा तुळजापूर येथील एकास अटक केल असून त्यांने गुन्हा केल्याचे कबूल केले आहे. ही घटना जुन्या भांडणातून झाल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, ईट शिवारात जातेगांव रस्त्यालगत असलेल्या आंबरईत विठ्ठल सोनबा चव्हाण (वय ५५) रा.ईट (ता.भूम) यांची दगडाने ठेचून निर्घृण हत्या झाली होती. ही घटना शनिवारी (दि.२३) सकाळी साडेअकरा वाजता घडकीस आली. त्यानंतर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलिस अधिक्षक राजतिलक रौशन, पोलिस उपविभागीय अधिकारी विशाल खांबे यांनी घटनास्थळी भेट दिली व त्यांच्या मार्गदर्शाखाली वाशीचे पोलीस निरीक्षक उस्मान शेख, पोहेकॉ. गोरख टकले, अच्युत कुटे, अशोक करवर, स्थानिक गुन्हे शाखा, ठस्से तज्ञ, शॉन पथक, पथकांनी अथक परिश्रम घेत आरोपीचा शोध घेतला. आरोपीचा तीन तासात शोध घेऊन अटक केली आहे. यामध्ये आरोपी अरिफ निसार सौदागर (वय २१) (रा.वेताळ गल्ली तुळजापूर) येथील असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

तसेच त्याने गुन्हे कबूल केल्याचे सांगितले. हा आरोपी येथील लिमकर यांच्या शेतात सालगडी म्हणून कामाला आलेला होता. मागील काही दिवसापूर्वी मयत विठ्ठल चव्हाण व आरोपी यांची शाब्दीक भांडण होऊन शिवीगाळ झाली होती. तोच राग मानात धरुन आरोपीने मयत विठ्ठल चव्हाण यांची शनिवारी (दि.२३) सकाळी विठ्ठल चव्हाण यांची दगडाने ठेचुन क्रुरपणे हत्या केली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ आरोपीस अटक केल्याने पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

अवैध वाळु उपसा करणारे तराफे जाळले

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,438FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या