21.4 C
Latur
Friday, October 7, 2022
Homeउस्मानाबादतुळजाई नगरीत स्वराज्य संघटनेच्या लोगो आणि ध्वजाचे अनावरण

तुळजाई नगरीत स्वराज्य संघटनेच्या लोगो आणि ध्वजाचे अनावरण

एकमत ऑनलाईन

तुळजापूर : छत्रपती संभाजीराजे यांनी घोषणा केलेल्या स्वराज्य संघटनेच्या लोगो व ध्वजाचे मंगळवारी दि. ९ रोजी क्रांतीदिनी तुळजापूर येथे तुळजाभवानीच्या दरबारात अनावरण करण्यात आले. शेतकरी, कामगार, सहकार, शिक्षण, आरोग्य या पंचसुत्रीचे व्हीजन घेवून स्वराज संघटना मैदानात उतरली आहे.

प्रारंभी छत्रपती संभाजीराजे यांचे तुळजापूर शहरात आगमन होताच त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजीराजे महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास पुष्पहार अर्पण केले. मंगळवारी दि. ९ ऑगस्ट क्रांतीदिनी तुळजापूर तीर्थक्षेत्रातून आई तुळजाभवानी मातेचा आशिर्वाद घेऊन स्वराज्य संघटनेच्या ध्वजाचे आणि लोगोचे अनावरण राज्यभरतातून आलेल्या शिवभक्तांच्या साक्षीने करण्यात आले.

मागच्या वेळी जेव्हा तुळजापूरला आलो होतो, त्यावेळी मंदिरात ज्या पद्धतीची गैरसोय झाली त्याबद्दल व्यक्त होत असताना संभाजीराजे छत्रपती म्हणाले की, मी मोठा नाही, घराणे मोठे आहे, आई तुळजाभवानी आमची कुलस्वामिनी असून मागील ३५० वर्षापासून पहिला नैवेद्य अभिषेक, कुलधर्म, कुलाचार नित्यनियमाने सुरू आहे. याची जाणीव मंदिर संस्थानला असूनही मला सिंहगार्भा­यात जाण्यापासून रोखले हे निषेधार्थ आहेच, नियम कसले दाखविता, आताच कुठून आले असे नियम, यापूर्वी का लावले गेले नाहीत. सोयीनुसार प्रशासन चालवू नका, माझ्यासाठी तो विषय बंद झाला आहे, असा सूचक इशाराही यावेळी बोलताना दिला.

मराठवाडा हा कायमस्वरूपी दुष्काळवाडा म्हणून हिनवले जाते. पश्चिम महाराष्ट्रातील वाया जाणारे पाणी मिळवण्यासाठी मराठवाड्यातील सर्व खासदार, आमदार एकत्र का येत नाहीत, का एकत्र लढा देत नाहीत, त्यांचे ते कर्तव्य आहे. पण स्वराज संघटना आता दुष्काळी मराठवाडासाठी नक्की काम करेल असा विश्वास यावेळी संभाजीराजे छत्रपती यांनी यावेळी दिला. यावेळी युवराज शहाजीराजे छत्रपती, मुख्य प्रवक्ते करण गायकर, अप्पासाहेब कुडेकर, गणेश कदम, सज्जन साळुंके, महेश गवळी, जीवनराजे इंगळे, अजय साळुंके, आबासाहेब कापसे, औदुंबर जमदाडे, प्रशांत कदम, राम चोपदार, पांडुरंग ढेरे, अण्णासाहेब क्षीरसागर, अर्जुन साळुंकेसह हजारो शिवभक्त उपस्थित होते.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या