21.9 C
Latur
Thursday, September 23, 2021
Homeउस्मानाबादजिल्ह्यात पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम

जिल्ह्यात पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम

एकमत ऑनलाईन

उस्मानाबाद : जिल्ह्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस भाजपाच्या वतीने विविध उपक्रमाने गुरुवारी (दि.१७) साजरा करण्यात आला. यानिमित्त उस्मानाबाद शहरात रक्तदान शिबीर, वृक्षारोपण, प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल मिळालेल्या लाभाथ्र्यांचा सत्कार आणि मृत कोरोनाबाधित रुग्णांचा अंत्यविधी करणा-या कोरोना योध्दांचा सत्कार करण्यात आला. कळंब येथे भाजपाच्या वतीने कोवीड सेंटरमधील रुग्णांना फळे वाटप करुन कोरोनाने मृत्यू झालेल्या रुग्णांवर अंत्यसंस्कार करणा-या कर्मचा-यांचा सत्कार करण्यात आला. तर परंडा, तुळजापूर तालुक्यातील अणदुर येथे रुग्णांना मान्यवरांच्या हस्ते फळे वाटप करण्यात आली.

उस्मानाबाद : येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा सप्ताहात भाजपाच्या वतीने रक्तदान शिबीर, वृक्षारोपण, प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल मिळालेल्या लाभार्थ्यांचा सत्कार आणि मृत कोरोनाबाधित रुग्णांचा अंत्यविधी करणा-या कोरोना योध्दांचा सत्कार करण्यात आला. रक्तदान शिबिराचे उद्घाटन आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते व भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

यामध्ये भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष राजसिंह राजेनिंबाळकर यांच्या पुढाकाराने अनेक तरुणांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. शहरातील प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल मिळालेल्या लाभार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच सांजा रोड येथील न. प. शाळा क्र. ६ येथे वृक्षारोपण करण्यात आले. व जिल्ह्यातील मृत कोरोनाबाधित रुग्णांचा अंत्यविधी करणा-या कोरोना योद्ध्यांचा सन्मान करण्यात आला.

याप्रसंगी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, प्रदेश कार्यकारणी सदस्य सतीश दंडनाईक, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष नेताजी पाटील, जिल्हा उपाध्यक्ष इंद्रजीत देवकते, माजी पं. स. सभापती संजय लोखंडे, जिल्हा सरचिटणीस प्रदीप qशदे, शहराध्यक्ष राहुल काकडे, तालुकाध्यक्ष राजकुमार पाटील, महिला आघाडी माधुरीताई गरड, ज्येष्ठ नेते नाना वाघ, युवराज ढोबळे, सिधोजी राजेनिंबाळकर, विनायक कुलकर्णी, आनंद भालेराव, गणेश देशमुख, ओम नाईकवाडी, श्रीराम उंबरे, राहुल शिंदे , गणेश येडके, गणेश इंगळगे, स्वप्नील नाईकवाडी, ओंकार वायकर, अqजक्य राजेqनबाळकर, पंकज जाधव, भगवंत गुंड-पाटील आदी उपस्थित होते.

कळंब : कळंब येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने पंतप्रधान मोदी यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यानिमित्त शहरातील कोविड केअर सेंटरमध्ये फळे वाटप करण्यात आले. त्यानंतर तालुक्यात महामारीत मृत्यूमुखी पडलेल्या रुग्णांचा अंत्यविधी करणारे कळंब नगर पालिकेचे कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला. तसेच मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त ज्या हुतात्म्यांच्या बलिदानामुळे मराठवाडा स्वतंत्र झाला या मुक्तीसंग्रामातील क्रांतिकारी आत्माराम गुंजाळ यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी तालुकाध्यक्ष अजित पिंगळे, दिलीप पाटील, शिवाजी गिड्डे, मिनाज शेख, सतपाल बनसोडे, माणिक बोंदर, अरुण चौधरी, संदीप बाविकर, संजय जाधवर, आबा रणदिवे, शितल चोंदे, गोपाळ चोंदे, प्रशांत लोमटे, राजा टोपे, बब्बू मिर्झा, अशोक क्षीरसागर, धम्मा वाघमारे, अब्दुल मुलानी आदी उपस्थित होते.

परंडा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त परंडा भारतीय जनता पार्टीच्या वतीने ग्रामीण रुग्णालय येथे कोरोनाबाधीत व इतर रूग्णांना फळे वाटप करण्यात आले. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष राजकुमार पाटील, सरचिटणीस विठ्ठल तिपाले, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष अनिल पाटील, सारंग घोगरे, उमाकांत गोरे, सतिश देवकर, आप्पासाहेब qशदे, मनोहर मिस्कीन, प्रमोद लिमकर, दादासाहेब गुडे, साहेबराव पाडुळे, सागर पाटील, रामकृष्ण घोडके, ब्रम्हदेव उपासे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

अणदूर : तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने विविध कार्यक्रम घेण्यात आले. येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णांना फळांचे वाटप जिल्हा उपाध्यक्ष अ‍ॅड. दिपक आलुरे, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख साहेबराव घुगे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच हुतात्मा स्मारक याठिकाणी गावातील सफाई कामगार व पाणीपुरवठा कर्मचारी यांचा सन्मान करण्यात येऊन मास्क व फळे देण्यात आली. यावेळी गुंडेशा गोवे, दयानंद मुडके, बालाजी कुलकर्णी, शाहुराज मोकाशे, म्हाळाप्पा घोडके, दीपक घुगे, अशोक घोडके, शिवा बिराजदार, किशोर मुळे , शेख इमाम आदी उपस्थित होते.

कांदा पुन्हा रडवणार…!

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या