21.2 C
Latur
Friday, October 7, 2022
Homeउस्मानाबादवाशी पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा

वाशी पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा

एकमत ऑनलाईन

उस्मानाबाद : वाशी पोलिस ठाण्याच्या पथकाने ८ ऑगस्ट रोजी पारगाव येथील बसस्थानकाजवळ सुरू असलेल्या तिरट जुगार अड्ड्यावर छापा टाकला. यावेळी पोलिसांनी ८ जणांना ताब्यात घेऊन त्यांच्या ताब्यातील जुगाराचे साहित्य, दुचाकी, मोबाईल, रोख रक्कम असा एकूण ८५ हजार ६६० रूपयांचा माल जप्त केला.

वाशी पोलिस ठाण्याचे पथक अवैध धंद्यांविषयी माहिती काढून कायदेशीर कारवाई करण्यासाठी दि. ८ ऑगस्ट रोजी गस्तीस होते. दरम्यान पथकास गोपनीय माहिती मिळाली की पारगाव बस स्थानकाजवळील एका शेडसमोर काही व्यक्ती तिरट जुगार खेळत आहेत. पथकाने त्या ठिकाणी सायंकाळी छापा टाकला असता तेथे पारगाव येथील राजेंद्र जाधव, संदिप कवडे, संतोष गव्हाणे, सुहास डोके, बाबासाहेब सुरवसे, विलास जाधव, आण्णा शिंदे, नितीन बनसोडे हे तिरट जुगार खेळत असताना जुगार पकडले.

पोलिसांनी जुगाराच्या साहित्यासह १ मोटारसायकल, ५ भ्रमणध्वनी व रोख रक्कम असा एकुण ८५ हजार ६६० रूपयांचा माल जप्त केला. ताब्यात घेतलेल्या ८ जणांच्या विरोधात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम-१२ (अ) अंतर्गत वाशी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कामगिरी पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांच्या मार्गदर्शनाखाली वाशी पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दळवे यांच्या पथकाने केली आहे.

 

 

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या