27 C
Latur
Saturday, August 13, 2022
Homeउस्मानाबादइटकूर येथील ग्रामविकास अधिकारी लाच घेताना अटक

इटकूर येथील ग्रामविकास अधिकारी लाच घेताना अटक

एकमत ऑनलाईन

उस्मानाबाद : वडील व चुलते यांच्या नावावर असलेले सामायिक घर तक्रादार यांच्या वडिलांच्या नावावर करण्यासाठी तक्रारदार यांचेकडून ५ हजाराची लाच घेताना इटकूर ता. कळंब येथील ग्रामपंचायतचा ग्रामविकास अधिकारी याला रंगेहात पकडण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने १९ जुलै रोजी ही कारवाई केली.

तक्रारदार यांचे वडिल आणि चुलते यांनी घेतलेल्या सामाईक घर जागेचे तक्रारदार यांचे वडिलांचे नावे वैयक्तिक फेर नोंद घेवून आठ अ ची नक्कल वैयक्तिक नावावर करून मिळणेबाबत तक्रारदार यांनी त्यांचे वडीलांचे नावे इटकूर ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी एजाज बशीर शेख (वय- ५० वर्षे) यांच्याकडे अर्ज दाखल केलेला होता. सदर काम करून देण्यासाठी आरोपी एजाज शेख यांनी तक्रारदार यांच्याकडे पाच हजार रुपये लाच रकमेची मागणी करून ५ हजार रुपये लाच रक्कम पंचा समक्ष स्वीकारली.

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक डॉ. राहुल खाडे, अपर पोलीस अधीक्षक विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधीक्षक प्रशांत संपते, सापळा अधिकारी विकास राठोड, सापळा पथकातील पोलीस अंमलदार मधुकर जाधव, सचिन शेवाळे, अर्जुन मारकड, सिद्धेश्वर तावसकर, चालक पोना दत्तात्रय करडे यांनी केली.

 

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या